नवी दिल्ली - जगभरात धूमाकुळ घातलेल्या कोरोना व्हायरसने आत्तापर्यंत १० हजार लोकांना आपल्या कवेत घेतले आहे. नुकत्याच आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघटनेच्या (एआयपीएस) अहवालानुसार , स्पेनमधील दोन क्रीडा पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - कोरोनाला मात देण्यासाठी 'हा' क्रिकेटपटू बनवतोय 'सॅनिटायझर्स'!
थॉमस डायझ वाल्डेस आणि जोस मारिया कॅनाडेला अशी या पत्रकारांची नावे आहेत. ५९ वर्षीय जोस यांनी रेडिओ नॅशनल डी स्पेन (आरएनई) साठी तर, ७८ वर्षीय थॉमस डायझ वाल्डेस यांनी मोटरपॉइंट नेटवर्क एडिटर्ससाठी काम केले आहे. ते ३० वर्ष स्पॅनिश वृत्तपत्र एएसचे रिपोर्टरही होते.
चीनच्या वुहान शहरातून जगभरात वाऱ्यासारखा पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १० हजाराहून अधिक लोकांचा प्राण गेला आहे. जगातील १५० हून अधिक देशात या विषाणूचा फैलाव झाला असून दीड लाखांहून अधिक लोकांना यांची बाधा झाली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने उपाययोजना करत आहे.