टोकियो - अवनी लेखराने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. तिने महिला आर-2 10 मीटर एअर रायफल स्टॅडिंग एसएच 1 मध्ये सुवर्ण पदक जिंकले. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर अवनीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अवनी म्हणाली, मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही. जगातील सर्वोच्च स्थानावर असल्याचे मला वाटत आहे. ही भावना शब्दात सांगता येणार नाही.
मी स्वत:ला समजावत होते की, आपल्याला फक्त एका शॉटवर लक्ष्य केंद्रित करायचे आहे. याशिवाय दुसरी कोणती बाब महत्वाची नाही. फक्त एका शॉटवर लक्ष्य द्यायचे. मी केवळ खेळावर लक्ष्य देत होते. मी स्कोर आणि पदकाविषयीचा विचार करत नव्हते, असे देखील अवनी सांगितले.
मी आपले सर्वोत्तम योगदान दिले, यामुळे मी खूश आहे. मला आशा आहे की, आपण आणखी पदक जिंकू. सहा वर्षांआधी नेमबाजीत उतल्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. मी या खेळाचा पुरेपूर आनंद घेते, असे देखील अवनी म्हणाली.
अवनी लेखरा पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू बनली आहे. दरम्यान, 2012 मध्ये झालेल्या कार अपघातात अवनीच्या कमरेखालच्या भागाने काम करणे बंद केले.
हेही वाचा - Exclusive: पॅरा अॅथलिट पहिल्यापासूनच रिअल हिरो आहेत, सुवर्णपदक विजेत्या अवनीच्या वडिलांची प्रतिक्रिया
हेही वाचा - Tokyo Paralympics : भारताची पॅरालिम्पिकमध्ये 7 पदकांची कमाई; अवनी लेखराचा सुवर्णवेध...