ETV Bharat / sports

Tokyo Paralympics : गोळाफेकमध्ये अरविंद 7व्या स्थानावर - राहुल जाखर

भारतीय अॅथलिट अरविंद टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पुरूष गोळाफेक एफ 35 स्पर्धेत सातव्या स्थानावर राहिला.

tokyo paralympics : arvind-finished-seventh-in-the-round-throw-f35-event
Tokyo Paralympics : गोळाफेकीत अरविंद 7व्या स्थानावर
author img

By

Published : Sep 2, 2021, 7:46 PM IST

टोकियो - भारतीय अॅथलिट अरविंद टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पुरूष गोळाफेक एफ 35 स्पर्धेत सातव्या स्थानावर राहिला. त्याला विनापदक परतावे लागले.

पहिलेच पॅराऑलिम्पिक स्पर्धा खेळत असलेला 28 वर्षीय अरविंद, आठ खेळाडूंच्या फायनलमध्ये सर्वश्रेष्ठ 13.48 मीटर लांब गोळा फेकू शकला. या स्पर्धेत उज्बेकिस्तानच्या खुसनिद्दीन नोरबेकोव याने सुवर्ण पदक जिंकले. त्याने 16.13 मीटरचा थ्रो केला. तर अर्जेंटिनाचा इमॅनुअल उरा याने 15.90 मीटरच्या थ्रो सह रौप्य पदकाला गवसणी घातली. चीनचा फु जिनहान 15.41 मीटरच्या थ्रोसह कास्य पदकाचा मानकरी ठरला.

भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंची दमदार कामगिरी

जगातील अव्वल पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत याने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली. त्याने पुरूष एकेरीच्या ग्रुप ए मधील दुसऱ्या सामन्यात युक्रेनच्या ओलोक्सांद्रे चिरकोव याचा पराभव केला. भगतसोबत भारताचे इतर पॅरा बॅडमिंटनपटू सुहास यतिराज, तरुण ढिल्लो आणि कृष्णा नागर यांनी पुरूष एकेरीत विजयी सुरूवात केली.

नेमबाज राहुल जाखर अंतिम फेरीत

भारताचा राहुल जाखर टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पी3 मिक्स्ड 25 मीटर पिस्तूल एसएच 1 इव्हेंटच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. तो पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिला. भारताचा दुसरा पॅरा नेमबाज आकाश याला अंतिम फेरी गाठता आली नाही. त्याला 20व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

हेही वाचा - Tokyo Paralympics : राहुल जाखर मिक्स्ड 25 मीटर पिस्तूल इव्हेंटमध्ये अंतिम फेरीत

हेही वाचा - Tokyo Paralympics : प्रमोद भगत उपांत्य फेरीत, सुहास, कृष्णा आणि तरुणची विजयी सलामी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.