टोकियो - भारतीय अमित कुमार आणि धरमबीर या दोघांना टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये अपेक्षित कामगिरी करता आला नाही. त्यांना एफ51 पुरूष क्लब थ्रोमध्ये अनुक्रमे पाचव्या आणि आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
अमित कुमार याने 27.77 मीटरचा थ्रो केला. याआधी तो रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता. अमित कुमार अशियाई पॅरा खेळात सुवर्ण पदक विजेता खेळाडू आहे. तर अशियाई पॅरा खेळ 2018 मध्ये धरमबीर याने 25.59 मीटरचा थ्रो करत रौप्य पदक जिंकले होते.
एफ51 पुरूष क्लब थ्रो मध्ये रुसी पॅराऑलिम्पिक समितीचा मुसा तायमाजोव याने 35.42 मीटरचा थ्रो करत सुवर्ण पदक जिंकले. चेक गणराज्यचा जेल्को डी याने रौप्य तर स्लोवाकियाच्या मरियन कुरेजा याने कास्य पदक जिंकले.
पॅराऑलिम्पिकमधील क्लब थ्रो हा ऑलिम्पिक तार गोळाफेक (हँमर थ्रो) प्रमाणेच असतो. यात लाकडी क्लबला फेकले जाते. दरम्यान टोकियो पॅराऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंना एकही पदक जिंकता आलं नाही. तर मंगळवारी भारतीय खेळाडूंनी पदके जिंकली होती.
हेही वाचा - Tokyo Paralympics: भगत-पलक मिश्र दुहेरी जोडीचा पहिल्या सामन्यात पराभव
हेही वाचा - Tokyo Paralympics : भारताला धक्का, स्विमर सुयश जाधव ठरला अपात्र, जाणून घ्या कारण