मुंबई - भारताची भाविनाबेन पटेल हिने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस खेळात रौप्य पदक जिंकले. भाविनाबेनला अंतिम सामन्यात चीनच्या यिंगकडून पराभूत व्हावे लागले. यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भाविनाच्या या ऐतिहासिक विजयानंतर राजकीय नेते, खेळाडू आणि बॉलीवूड स्टार भाविनाबेनचे अभिनंदन करत आहेत.
चीनच्या झोउ यिंगने सुवर्णपदकासाठी झालेल्या सामन्यात भाविनाबेन पटेलचा 3-0 ने सरळ सेटमध्ये पराभव केला. पण रौप्य पदकासह भाविनाबेन टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली. यानंतर ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्राने भाविनाबेनचे कौतुक केले. दरम्यान, अभिनव बिंद्राने 2008 ऑलिम्पिकमध्ये शुटिंग खेळात सुवर्ण पदक जिंकले होते.
भाविनाबेन पटेलने रौप्य पदक जिंकल्यानंतर अभिनव बिंद्राने ट्विट केले आहे. यात तो म्हणतो, रौप्य पदक जिंकत उत्कृष्ठ कामगिरी केल्याने आणि टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले पदक विजेता बनल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. सर्व समस्यांना तोंड देत टोकियो अशी कामगिरी केल्याने संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे.
-
Fantastic performance by @BhavinaPatel6 to bag a silver and open India's account in the #Tokyo2020 @Paralympics. Wonderful show of skill and mental resilience. Extremely proud! #Praise4Para
— Abhinav A. Bindra OLY (@Abhinav_Bindra) August 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Fantastic performance by @BhavinaPatel6 to bag a silver and open India's account in the #Tokyo2020 @Paralympics. Wonderful show of skill and mental resilience. Extremely proud! #Praise4Para
— Abhinav A. Bindra OLY (@Abhinav_Bindra) August 29, 2021Fantastic performance by @BhavinaPatel6 to bag a silver and open India's account in the #Tokyo2020 @Paralympics. Wonderful show of skill and mental resilience. Extremely proud! #Praise4Para
— Abhinav A. Bindra OLY (@Abhinav_Bindra) August 29, 2021
पहिला सामना गमावल्यानंतर भाविनाबेन पटेलने पुढील तीन सामन्यात गुण मिळवण्यासाठी संघर्ष केला आणि क्रमवारीत अव्वल असलेल्या खेळाडूंना पराभूत केले. हे पाहणे खूप सुखद होते, असे देखील अभिनव बिंद्रा म्हणाला.
दरम्यान, भाविनाबेन पटेल पॅराऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी दुसरी महिला खेळाडू आहे. याआधी पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी पदक जिंकले होते. त्यांनी रिओ 2016 ऑलिम्पिकमध्ये थाळीफेक खेळात रौप्य पदक जिंकले होते.
हेही वाचा - Tokyo Paralympics : उंच उडीत निषाद कुमारची कमाल, देशाला जिंकून दिलं दुसरे रौप्य पदक
हेही वाचा - Tokyo Paralympics : टोकियोत भारताने जिंकले तिसरे पदक, विनोद कुमारची कास्य पदकाला गवसणी