ETV Bharat / sports

Tokyo Olympics : बॉक्सर अमित पांघल पहिल्या सामन्यात रौप्य पदक विजेत्या खेळाडूकडून पराभूत

भारताचा अव्वल पुरूष बॉक्सर अमित पांगलचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. 52 किलो वजनी गटात पांगलचा कोलंबियाच्या युबेरजेन मार्तीनिझ याने 4-1 ने पराभव केला.

tokyo olympics top-seed-amit-panghal-suffers-shock-loss-against-yuberjen-martinez
Tokyo Olympics : बॉक्सर अमित पांघल पहिल्या सामन्यात रौप्य पदक विजेत्या खेळाडूकडून पराभूत
author img

By

Published : Jul 31, 2021, 10:31 AM IST

टोकियो - भारताचा अव्वल पुरूष बॉक्सर अमित पांगलचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. 52 किलो वजनी गटात पांघलचा कोलंबियाच्या युबेरजेन मार्तीनिझ याने 4-1 ने पराभव केला. दरम्यान, अमित पांघलकडून देशाला पदकाच्या आशा होत्या. त्या आशा धूळीस मिळाल्या आहेत. दरम्यान, युबेरजेन मार्तीनिझ हा रिओ ऑलिम्पिक 2016 चा रौप्य पदक विजेता खेळाडू आहे.

अमित पांगलचे हे पहिलं ऑलिम्पिक होतं. कोलंबियाच्या युबेरजेन मार्तीनिझ याने पांघलवर सुरूवातीपासून सामन्यात दबाव निर्माण केला होता. पण पांघलने शानदार वापसी करत, पहिल्या फेरी अवघ्या तीन मिनिटात 4-1 अशी जिंकली. त्यानंतर कोलंबियाच्या युबेरजेन मार्तीनिझचा सामना करण्यात पांघल अपयशी ठरला.

दुसऱ्या फेरीत कोलंबियाच्या बॉक्सरने पांघलला जोरदार ठोसे मारले. ज्याचे उत्तर पांघलला देता आलं नाही. तीन मिनिटांपर्यंत हा क्रम जारीच होता. पांघल फक्त बचाव करत राहिला.

आशिया क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये सुवर्ण पदक आणि विश्व चॅम्पियनशीप 2019 मध्य रौप्य पदक जिंकणाऱ्या अमित पांगल याने आशिया क्रीडा स्पर्धेत तीन वेळा पदक जिंकलं आहे. तर कोलंबियाचा युबेरजेन मार्तीनिझ रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये रौप्य पदक विजेता आहे. दुसरीकडे भारताची महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने शुक्रवारी 69 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केलं आहे.

हेही वाचा - कोण आहे कमलप्रीत कौर; जिच्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या

हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय थाळीफेकपटू कमलप्रीत कौरचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.