ETV Bharat / sports

Tokyo Olympics: मराठमोळा तिरंदाज प्रविण जाधव हरला; पण लढला

अंतिम 16 फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडी एलिसन याने प्रविण जाधवला पराभवाचा धक्का दिला. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ब्रॅडी एलिसनने सामना ६-० ने सहज खिशात घातला.

Tokyo Olympics: Indian archer Pravin Jadhav loses to second-seed Brady Ellison
Tokyo Olympics: भारताचा मराठमोळा प्रविण जाधव हरला; पण लढला
author img

By

Published : Jul 28, 2021, 2:22 PM IST

टोकियो - भारताचा मराठमोळा तिरंदाज प्रविण जाधवने पुरूष तिरंदाजी स्पर्धेच्या एकेरी गटात रशियाच्या गलसान बझारझापोव्हला धक्का दिला. गलसान जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. प्रविणने अशा मातब्बर खेळाडूला पराभूत केल्याने भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या. परंतु, राउंड 16 च्या फेरीत प्रविणला पराभव पत्कारावा लागला.

प्रविण जाधवने गलसानला पराभूत करण्याची किमया पात्रता फेरीमध्ये साधली. त्याने गलसानचा 6-0 ने एकतर्फा पराभव केला. पदकापर्यंत पोहचण्यासाठी त्याला किमान दोन विजय आवश्यक होते. मात्र अंतिम सोळा जणांच्या फेरीत प्रविणचा अमेरिकेच्या तिरंदाजाने पराभव केला आणि त्याचे वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

अंतिम 16 फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडी एलिसन याने प्रविणला पराभवाचा धक्का दिला. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ब्रॅडी एलिसनने सामना ६-० ने सहज खिशात घातला.

प्रविण जाधवबद्दल...

प्रविण जाधव सातारा जिल्ह्यातल्या सरडे गावाचा रहिवाशी आहे. त्याची आई-वडिल रोजंदारीवर काम करून घर चालवतात. अशा स्थितीत तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत प्रविणने टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे. नेदरलँडमध्ये 2019 साली पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत, भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने, सांघिक गटात धडाकेबाज कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली होती. या संघात प्रविण जाधव देखील होता.

हेही वाचा - मनिका बत्राला ऑलिम्पिकमधील 'ती' चूक महागात पडणार, टेबल टेनिस संघ कारवाईच्या तयारीत

हेही वाचा - Tokyo Olympics: 13 वर्षीय मोमीजी निशिया नाही तर 'हा' आहे सर्वात युवा अॅथलिट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.