टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एका क्रीडा प्रकारात पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तो क्रीडा प्रकार आहे नौकानयन. या प्रकारात नौकानयनपटू अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह या पुरूष जोडीने लाइटवेट डबल स्कल स्पर्धेत तिसरे स्थान पटकावत उपांत्य फेरी गाठली आहे.
अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह या भारतीय जोडीने ६:५१:३६ अशी वेळ नोंदवत रेपेचेज राऊंडमध्ये तिसरे स्थान पटकावले. पोलंडच्या जोडीने या फेरीत पहिले स्थान पटकावले. तर स्पेनची जोडी दुसऱ्या स्थानावर राहिली. भारतीय जोडीचा पुढील सामना 27 जुलै रोजी होणार आहे.
उपांत्य फेरीत भारतीय जोडीसमोर स्पेन, बेल्जियम, आयरलंड, इटली आणि युक्रेनचे आव्हान असणार आहे. या उपांत्य फेरीतील टॉप 3 जोडी अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
दरम्यान, त्याआधी पहिल्या दिवशी भारतीय जोडीने लाइटवेट डबल स्कल हीट प्रकारात पाचवे स्थान पटकावले होते. यामुळे भारतीय जोडीला थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यांना रेपेचेज राऊंडमध्ये खेळावे लागले.
हेही वाचा - Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकमध्ये वाद; मनिका बत्राने नाकारला प्रशिक्षकाचा सल्ला
हेही वाचा - मोफत पिझ्झा ते ही आयुष्यभर; रौप्य पदक विजेती मीराबाई चानूसाठी पिझ्झा कंपनीची घोषणा