टोकियो - अर्जेंटिनाची महिला तलवारबाज मारिया बेलेन पेरेज मॉरिस हिचे सोमवारी टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले. यामुळे ती निराश होती. आपल्या पराभवाबद्दल ती माध्यमाशी बोलत असताना अचानक तिच्या प्रशिक्षकाने तिला प्रपोज केलं. प्रशिक्षकाने ठेवलेला प्रपोजल मारिया नाकारू शकली नाही.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 36 वर्षीय मारिया बेलेन पेरेज मॉरिस एका मुलाखतीमध्ये पराभवाचे विश्लेषन करत होती. तेव्हा तिचे प्रशिक्षक गुइलेर्मो सौसेडो हे एका पेपरवर स्पेन भाषामध्ये, माझ्याशी लग्न करशील हा प्रस्ताव लिहीत तिच्यापाठी मागे उभे राहिले. तेव्हा मुलाखत घेणाऱ्याने मारियाला मागे वळून पाहण्याचा इशारा केला. तेव्हा प्रशिक्षकाचा लग्नाचा प्रस्ताव पाहून मारिया अचंबित झाली. ती जोरात हसू लागली आणि तिने लगेच प्रशिक्षकाच्या प्रस्तावाला होकार दिला.
मारियाने माध्यमाशी बोलताना सांगितलं की, "मी प्रशिक्षकांचा लग्नाचा प्रस्ताव पाहून सर्व काही विसरले. मी त्यांना खूप पसंत करते. हे देवा, मी खूप खूश आहे. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य घालवू इच्छित आहोत."
लग्नाच्या प्रस्तावाबाबत प्रशिक्षक सौसेडो यांनी सांगितलं, "मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि जेव्हा ती पराभूत झाली. तेव्हा मी खूप दु:खी झाले. तिची ही मानसिकता बदलण्यासाठी मी कागदावर लग्नाचा प्रस्ताव लिहला. जर ती जिंकली असती तर मी या क्षणाची आणखी प्रतिक्षा केली असती."
दरम्यान, दोघांची भेट ही तलवारबाजीमुळे झाली. सौसेडो हे प्रशिक्षक बनण्याआधी अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करत होते.
हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय बॉक्सर लवलिना बोर्गोहेन पदकापासून एक पाऊल दूर
हेही वाचा - Tokyo Olympics : गे असल्याचा अभिमान! सुवर्णपदक जिंकल्यानंतर खेळाडूचा खळबळजनक खुलासा