ETV Bharat / sports

Tokyo Olympics : सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले; उपांत्य फेरीत पी. व्ही. सिंधूचा पराभव - सिंधू

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला जबर धक्का बसला. भारताची पदकाची आशा असलेल्या पी. व्ही. सिंधूला उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागला. चीनच्या ताय झू यिंगने सिंधूचा 21-18, 21-12 ने पराभव केला.

tokyo olympics 2020 : Tai Tzu-Ying beat PV Sindhu in semifinal
Tokyo Olympics : भारताला जबर धक्का; पी. व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव
author img

By

Published : Jul 31, 2021, 4:44 PM IST

Updated : Jul 31, 2021, 5:21 PM IST

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला जबर धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या पी. व्ही. सिंधूला उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागला. चीनच्या ताय झू यिंगने सिंधूचा 21-18, 21-12 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. सिंधू आता कांस्य पदकासाठी आणखी एक सामना खेळेल. या सामन्यात तिच्यासमोर चीनच्या ही बिंग जिआओ हिचे आव्हान असणार आहे.

पहिल्या फेरीत सिंधू-झू यिंग यांच्यात कडवी झुंज -

पी. व्ही. सिंधू आणि चीनी तैईपेची खेळाडू ताय झू यिंग यांच्यात पहिल्या सेटमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. सिंधूने यात 12-10 ने पुढे होती. परंतु झू यिंगने जोरदार पुनरागमन करत हा सेट 21-18 असा जिंकला.

दुसऱ्या फेरीत झू यिंगचा बोलबाला -

पहिला सेट गमावल्यानंतर सिंधू दुसऱ्या फेरीत पुनरागमन करेल, अशी आशा होती. परंतु, झू यिंगने सिंधूला पुनरागमनाची संधीच दिली नाही. तिने 11-7 अशी आघाडी घेतली. या दरम्यान, झू यिंगने सिंधूला चूका करण्यास भाग पाडलं. पहिला सेट गमावल्याचा दबाव सिंधूच्या खेळात स्पष्ट जाणवत होता. झू यिंगने दुसऱ्या सेटमध्ये सिंधूचा 21-12 असा पराभव केला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूची कामगिरी -

रिओ ऑलिम्पिकधील रौप्य पदक विजेता पी. व्ही. सिंधूचा टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिला सामना इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा हिच्याशी झाला. या सामन्यात सिंधूने 21-7, 21-10 अशी बाजी मारली.

ग्रुप जे मध्ये दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर हाँगकाँगच्या च्युंग एनगान हिचे आव्हान होते. सिंधूने च्युंगचे आव्हान 21-9, 2-16 असे मोडत तिसरी फेरी गाठली.

तिसऱ्या फेरीत सिंधूचा सामना डेन्मार्कचा मिया ब्लिचफेल्ड हिच्याशी झाला. तेव्हा सिंधूने हा सामना अवघ्या 41 मिनिटात 21-15, 21-13 अशा फरकाने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

उपांत्य फेरीत सिंधूची गाठ जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी झाली. या सामन्यात सिंधूने 21-13, 22-20 ने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती. पण उपांत्य फेरीत चीनच्या ताय झू यिंगने सिंधूचा पराभव केला.

हेही वाचा - Tokyo Olympics : भाऊ.. लवलिनानं उपांत्य फेरी गाठताच पदक पक्कं केलं, पण सिंधूचं का झालं नाही?

हेही वाचा - Tokyo Olympics : पोरींची कमाल! रोमांचक सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने आफ्रिकेला नमवलं

Last Updated : Jul 31, 2021, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.