मुंबई - टोकियो पॅराऑलिम्पिकला उद्या मंगळवारपासून सुरूवात होत आहे. या पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय अॅथलिट सर्वश्रेष्ठ प्रदर्शनाने इतिहास रचतील, अशी आशा भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष दीपा मलिक यांनी व्यक्त केली.
टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय अॅथलिट नऊ खेळात भाग घेणार आहेत. तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, कॅनोइग, शूटिंग, स्विमिंग, पावरलिफ्टिंग, टेबल टेनिस आणि तायक्वांदो या खेळात भारतीय खेळाडू पदकासाठी आपलं योगदान देतील. दरम्यान, भारताने यंदा 54 खेळाडूंचा सर्वात मोठा संघ पाठवला आहे.
भारतीय खेळाडूंच्या सर्वश्रेष्ठ कामगिरीबद्दल आशा व्यक्त केली जात असल्याचे विचारले असता, दीपा मलिक म्हणाल्या की, नक्कीच माझी देखील आशा आहे. या वर्षी भारताने आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ पाठवला आहे. मला आशा आहे की, आम्ही इतिहास रचू.
कोरोना महामारीत दोन वर्ष वाया गेली. तरी देखील मोठ्या संख्येत भारतीय अॅथलिट पॅराऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. अनेक खेळाडूंनी जागतिक क्रमवारीनुसार देखील कोटा मिळवला आहे. खेळाडूंची संख्या आणि खेळ प्रकारात वाढ झाली आहे. तसेच आमच्याकडे अव्वल रॅकिंगचे खेळाडू आहे. जे एक चांगलं संकेत आहे. हे पॅराऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरू शकते, असे देखील दीपा मलिक यांनी सांगितलं.
2016 रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने चार पदके जिंकली होती. यात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्यचा समावेश आहे. दरम्यान, दीपा मलिक या पॅराऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये शॉट पूलमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं.
हेही वाचा - shaili singh : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 'शैली'ची रुपेरी चमक
हेही वाचा - Asian Junior Championships: दुबईत भारतीय बॉक्सिंगपटूंची छाप, आणखी 4 खेळाडू उपांत्य फेरीत