नवी दिल्ली - तीन वेळा Formula 1 वर्ल्ड चँम्पियन राहिलेल्या आस्ट्रियाचे महान खेळाडू निकी लॉडा यांचे सोमवारी 70 व्या वर्षी निधन झाले आहे. निकी यांनी 1975 आणि 1977 मध्ये फेरारीसाठी तर 1984 ला मॅकलॅरेनसाठी किताब जिंकला आहे.
ब्रिटेनचे महान फॉर्मूला-1 चालक जेम्स हंट यांच्यासोबत लॉडा यांची झालेली रेस अविस्मरणीय होती. या दोघांमध्ये झालेल्या रेसवर 'रश' नावाचा एक चित्रपटही तयार करण्यात आला होता. ज्यात डेनियल ब्रूलने निकी तर क्रिस हेम्सवर्थने हंटची भूमिका साकारली होती.
निकी यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय म्हणाले की, ते आमच्यासाठी एक रोल मॉडेल होते आणि ते एक बेंचमार्क करुन गेले आहेत.