ETV Bharat / sports

Asian Junior Championships: दुबईत भारतीय युवा बॉक्सिंगपटूंचा जलवा, पक्के केले 3 पदक

एएसबीसी आशियाई युवा आणि ज्यूनियर बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारतीय बॉक्सिंगपटूंनी चांगली कामगिरी नोंदवली. भारताचे या स्पर्धेत 3 पदक पक्के झाले आहेत.

Three Indians assured of medals at ASBC Asian Youth & Junior Boxing Championships
Asian Junior Championships: दुबईत भारतीय युवा बॉक्सिंगपटूंचा जलवा, पक्के केले तीन पदक
author img

By

Published : Aug 21, 2021, 5:04 PM IST

दुबई - येथे सुरू असलेल्या एएसबीसी आशियाई युवा आणि ज्यूनियर बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारतीय बॉक्सिंगपटूंनी चांगली कामगिरी नोंदवली. भारताचे या स्पर्धेत 3 पदक पक्के झाले आहेत. बॉक्सर रोहित चामोली (48 किलो), अंकुश (66 किलो) आणि गौरव सैनी (70 किलो) यांनी आपापल्या वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे.

भारतीय बॉक्सर रोहित चामोली याने ज्यूनियर मुलांच्या उपांत्यपूर्ण फेरीत अलहसन कादौस स्त्रिया याचा 5-0 ने धुव्वा उडवला. तर अंकुश याने कुवेतच्या बदर शेहाब याला 5-0 अशी सहज धूळ चारत उपांत्य फेरीत धडक दिली.

हरियाणाचा गौरव सैनीचा देखील या स्पर्धेत दबदबा राहिला. त्याने उपांत्यपूर्व फेरीत कुवेतच्या याकूब सदाल्लाह याचा पराभव केला. उभय खेळाडूमधील सामना पंचांनी दुसऱ्या राउंडमध्ये रोखत सैनीला विजयी घोषित केलं.

दुसरीकडे आणखी तीन ज्यूनियर बॉक्सरनीं पहिला सामना जिंकत पुढील फेरी गाठली आहे. आशिष (54 किलो), अंशुल (57 किलो) आणि प्रीत मलिक (63 किलो) पुढील फेरीत पोहोचले आहेत.

यशवर्धन सिह (60 किलो), उस्मान मोहम्मद सुल्लान (50 किलो), नक्ष बेनिवाल (75 किलो), ऋषभ सिंह (81 किलो) यांना पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसला.

भारताचे सहा बॉक्सर दुसऱ्या दिवशी रिंगमध्ये उतरणार आहेत. यात विश्व युवा चॅम्पियनशीप 2021 चा कास्य पदक विजेता बिश्वमित्र चोंगथाम याचा समावेश आहे.

दरम्यान, आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धा कोरोना महामारीमुळे दोन वर्षानंतर खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्याला 6,000 डॉलर, रौप्य पदक विजेत्याला 3,000 डॉलर आणि कास्य पदक विजेत्याला 1,500 डॉलरचे बक्षिस देण्यात येणार आहे.

ज्यूनियरच्या विजेत्याला 4,000 डॉलर तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांच्या विजेत्याला अनुक्रमे 2,000 आणि 1,000 डॉलर मिळणार आहेत.

हेही वाचा - नीरज चोप्राचे नाव पुण्यातील स्टेडियमला देण्यात येणार, राजनाथ सिंह घोषणा करण्याची शक्यता

हेही वाचा - World Athletics Championships: अमित खत्रीची रौप्य पदकाला गवसणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.