नवी दिल्ली - विश्व अॅथलिट अंडर-20 चॅम्पियनशीपमध्ये भारताची महिला धावपटू प्रिया मोहन दमदार कामगिरी केली. तिने 400 मीटरचे अंतर 52.77 सेंकदात कापत सर्वोत्कृष्ठ कामगिरी नोंदवली. तिच्या या कामगिरीनंतर भारताची दिग्गज धावपटू हिमा दास हिने तिचे कौतुक केले. प्रिया मोहन हिने शानदार सुरूवात केली असून अजून खूप लांब पल्ला गाठायचा आहे, असे हिमाने म्हटलं आहे.
हिमा दासने या संदर्भात ट्विट केलं आहे. ती तिच्या ट्विटमध्ये म्हणते की, प्रिया मोहन हिने 400 मीटर रेसमध्ये 52.77 वेळ घेत चौथे स्थान पटकावले. विश्व अॅथलिट अंडर-20 चॅम्पियनशीपमध्ये हे ग्रेट स्टार्ट आहे. ही तर फक्त सुरूवात असून आता आणखी खूप लांब पल्ला गाठायचा आहे.
दरम्यान, प्रिया मोहन विश्व अॅथलिट अंडर-20 चॅम्पियनशीपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिली. केनियाच्या सिल्विया चेलंगट हिने तिच्यापेक्षा 0.54 सेंकद कमी वेळ घेत तिसरे स्थान मिळवले. पण या कामगिरीसह प्रिया मोहनने आपली कामगिरी सुधारली.
विश्व अॅथलिट अंडर-20 चॅम्पियशीपमध्ये भारतीय धावपटू अमित खत्रीने पुरूष 10,000 मीटर रेस वॉकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. तर भारतीय मिक्स्ड रिले संघ 4x400 मीटरमध्ये कास्य पदकाचा विजेता ठरला आहे.
हेही वाचा - Asian Junior Championships: दुबईत भारतीय युवा बॉक्सिंगपटूंचा जलवा, पक्के केले 3 पदक
हेही वाचा - World Athletics Championships: अमित खत्रीची रौप्य पदकाला गवसणी