केरळ - क्रीडाविश्वात नानाविध आश्चर्यचकित करणाऱ्या घडामोडी घडत असतात. या घडामोडींचे आपण व्हिडिओच्या माध्यमातून साक्षीदार होत असतो. असाच एक १० वर्षाच्या फुटबॉलपटूचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड होत आहे. हा फुटबॉलपटू केरळचा असून त्याच्या अफलातून फुटबॉलकौशल्याने समस्त नेटिझन्स त्याच्याकडे आकर्षित झाले आहेत.
-
Superb ..മോനെ... pic.twitter.com/EEXrlUPOWD
— I M Vijayan (@IMVijayan1) February 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Superb ..മോനെ... pic.twitter.com/EEXrlUPOWD
— I M Vijayan (@IMVijayan1) February 11, 2020Superb ..മോനെ... pic.twitter.com/EEXrlUPOWD
— I M Vijayan (@IMVijayan1) February 11, 2020
हेही वाचा - थायलंडवर सरशी.. भारताची एशियन टीम चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक
केरळमधील दानी नावाच्या दहा वर्षांच्या फुटबॉलरने 'कॉर्नरकिक' गोल करून फुटबॉल चाहत्यांना आश्चर्यचकित केले. दानीच्या आईने त्याचा हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. माजी भारतीय फुटबॉलपटू आय. एम. विजयननेही हा व्हिडिओ शेअर केला आहे.
मीनानगडी येथे ९ फेब्रुवारी रोजी खेळल्या गेलेल्या ऑल केरळ किड्स फुटबॉल स्पर्धेचा हा सामना अंतिम होता. केरळ फुटबॉल प्रशिक्षण केंद्राकडून (केएफटीसी) खेळत दानीने सामन्यात हॅटट्रिक केली. या स्पर्धेत १३ गोल नोंदविणार्या दानीला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून निवडले गेले. 'कॉर्नरकिक' गोलवरून दानीची तुलना दिग्गज मेस्सीशी केली जात आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ आतापर्यंत २०,००० पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे, तर ३०० पेक्षा जास्त वेळा या व्हिडिओला रिट्वीट केले.