नागपूर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या नागपूर सामन्यात ऑस्ट्रेलियन मीडिया आणि माजी परदेशी क्रिकेटपटूंनी भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजावर केलेल्या बॉल टॅम्परिंगच्या आरोपांवर टीम इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, टीम इंडियाने आयसीसी मॅच रेफ्रींना उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, जडेजाने वेदना कमी करण्यासाठी हाताच्या बोटांवर मलम लावले होते. मात्र, ऑस्ट्रेलिया संघाने याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचेही कळते. पण, ऑस्ट्रेलियन मीडियाने एक व्हिडिओ नक्कीच जारी केला होता.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण : नागपूर येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, भारताच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज टिकू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ 177 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 बळी घेतले, तर अश्विनने 3, सिराज आणि शमीने 1-1 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियन मीडियाने चुकीचा व्हिडीओ जारी केला : जडेजाने मार्नस लबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब आणि टॉड मर्फी यांना बाद केले. दरम्यान, ऑस्ट्रेलियन मीडिया आउटलेट Foxsports.com.au ने टीम इंडियाच्या शानदार गोलंदाजीने थक्क झालेल्या सामन्याचा व्हिडिओ जारी केला. व्हिडिओमध्ये, रवींद्र जडेजा चेंडू फेकण्यापूर्वी गोलंदाज मोहम्मद सिराजकडून काहीतरी घेतो आणि त्याच्या बोटांवर ठेवतो. परंतु, खरे पाहता बोटांना झालेल्या दुखापतीवर तो बोटांना बाम लावत होता. याचा निष्कारण बाऊ करून ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावर चर्चेला उधाण : यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडिया फॉक्स आणि परदेशी क्रिकेटपटूंनी टेम्परिंगचा मुद्दा उपस्थित करण्यास सुरुवात केली. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने ट्विट केले की, 'तो फिरणाऱ्या बोटावर काय ठेवत आहे? हे कधी पाहिले नाही'. व्हिडिओबाबत, परदेशी खेळाडू आणि ऑस्ट्रेलिया मीडिया या प्रकरणाला अतिशयोक्ती देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी दिलेल्या या चर्चेमुळे निष्कारण भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजाची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे.
टीम इंडियाचे आयसीसी मॅच रेफरींना प्रत्युत्तर : त्यांनी रवींद्र जडेजावर बॉल टॅम्परिंगचा आरोप करण्याचा कट रचत राहिला. मात्र, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणावर टीम इंडियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र आज टीम इंडियाने आयसीसी मॅच रेफरींना प्रत्युत्तर देत प्रतिस्पर्ध्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा : Ricky Ponting Praise on Jadeja : पाच विकेट्स घेतल्यानंतर रिकी पाँटिंगने केले रवींद्र जडेजाचे तोंडभरून कौतुक