नवी दिल्ली : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव केला आहे. भारताच्या या विजयात अष्टपैलू रवींद्र जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात रवींद्र जडेजाने 10 विकेट घेऊन, मोठी कामगिरी केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने भारतीय संघावर टीका करायला सुरुवात केली. त्यात कहर म्हणजे सामना हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने रवींद्र जडेजाविषयी संशय व्यक्त केला. त्याने चेंडूला काहीतरी लावले आहे, असा गंभीर आरोप केला. परंतु, व्हिडीओ आणि चाचणीत काहीही आढळून आले नाही. रवींद्र जडेजाला दंड भरण्याव्यतिरिक्त यामध्ये काहीही झाले नाही.
अक्षर ने घेतली जडेजाची मुलाखत : त्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने आपल्याच खेळाडूंना टोमणे मारण्यास सुरुवात केली. दुसऱ्या चाचणीनंतर अक्षर पटेलने रवींद्र जेडजा यांची मुलाखत घेतली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप ट्रेंड करीत आहे. अक्षर जडेजाला प्रश्न विचारत आहे आणि जडेजा त्याच्या प्रश्नांना अतिशय मनोरंजक उत्तरे देताना दिसत आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अक्षर पटले रवींद्र जडेजाची मुलाखत घेताना दिसत आहेत. अक्षर पटले अतिशय रोमँटिक पद्धतीने रवींद्र जडेजाला प्रश्न विचारताना दिसत आहे. अक्षरच्या प्रश्नांना उत्तर देताना जडेजाही खूप आनंदी दिसत आहे.
-
From setting the stage on fire & discussing tactics to sharing moments of laughter 🔥😎
— BCCI (@BCCI) February 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The all-round duo of @imjadeja & @akshar2026 chats after #TeamIndia win the 2️⃣nd #INDvAUS Test 👍 👍 - By @RajalArora
FULL INTERVIEW 🎥 ⬇️https://t.co/YW7ZMWSBwX pic.twitter.com/gAqNvrvRHO
">From setting the stage on fire & discussing tactics to sharing moments of laughter 🔥😎
— BCCI (@BCCI) February 20, 2023
The all-round duo of @imjadeja & @akshar2026 chats after #TeamIndia win the 2️⃣nd #INDvAUS Test 👍 👍 - By @RajalArora
FULL INTERVIEW 🎥 ⬇️https://t.co/YW7ZMWSBwX pic.twitter.com/gAqNvrvRHOFrom setting the stage on fire & discussing tactics to sharing moments of laughter 🔥😎
— BCCI (@BCCI) February 20, 2023
The all-round duo of @imjadeja & @akshar2026 chats after #TeamIndia win the 2️⃣nd #INDvAUS Test 👍 👍 - By @RajalArora
FULL INTERVIEW 🎥 ⬇️https://t.co/YW7ZMWSBwX pic.twitter.com/gAqNvrvRHO
हसत हसत मांडली व्यथा : व्हिडीओमध्ये अक्षर जडेजाच्या बॉलिंगबद्दल हसत हसत आपली व्यथा मांडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अक्षर जडेजाला म्हणताना दिसतोय की, 'माझ्याकडे गोलंदाजीसाठी चेंडूच येत नाहीये, मी उलट वाट पाहतोय की, माझी बॉलिंग (गोलंदाजी) करण्याची वेळ कधी येणार परंतु, तुम्ही (रवींद्र जडेजा) असे काही करता की आमच्याकडे गोलंदाजीसाठी चेंडूच येत नाही. मी कर्णधाराकडे विनंती करतो की, माझी बॉलिंगची वेळ कधी येणार. परंतु, दुर्दैव तुम्ही आमच्या वाटेची सर्व बॉलिंग करून मोकळे होता, तुम्ही प्रतिस्पर्धी संघच शिल्लक ठेवत नाही. तुम्ही कदाचित अक्षरला बाॅलिंग न मिळावी याकरिता एवढी सुंदर गोलंदाजी करीत नाही ना? असा प्रतिप्रश्नदेखील अक्षरने विचारला. तसेच, तुम्ही 6 महिन्यांच्या ब्रेकनंतर आले आहात तरीसुद्धा एवढी मोठी कामगिरी करता, तुम्ही (रवींद्र जडेजा) काय घरी बसून प्रॅक्टीस करीत होता. आणि आता ठरवून आले आहात का, सगळा बॅकलोक काढून घेतो? सर्व वचपा काढून घेताय का? यावर रवींद्र जडेजाने मजेशीर उत्तर देत वातावरण हलके आणि मजेशीर केले.
प्रश्नांना दिले मजेशीर उत्तर : रवींद्र जडेजाने मजेशीर उत्तर देताना सांगितले की, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाज नाथन लियोनने टीम इंडियाच्या 5 वेळा यष्टी उडवल्याने माझ्या कानात खनखनचा आवाज घुमत होता. मी केवळ या खनखनाटाला दणक्यात उत्तर देत ऑस्ट्रेलियाच्या 10 विकेट घेतल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने आपल्या अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करताना भारताच्या पहिल्या डावात ५ बळी घेतले. याला प्रत्युत्तर म्हणून रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० विकेट घेतल्याचे सांगितले.
टीम इंडियाला पुढे नेऊ : रवींद्र जडेजाने अक्षर पटेलचे कौतुक करीत म्हटले की, 'जेव्हा तुम्ही फलंदाजी करता तेव्हा असे वाटत नाही की आम्ही वळणावळणाच्या ट्रॅकवर कमी उसळीच्या खेळपट्टीवर खेळत आहोत. असे दिसते की सपाट पृष्ठभाग आहे आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज त्यावेळी सामान्य दिसू लागतात. जडेजाने अक्षरला त्याच्या फलंदाजीचे रहस्यही असे विचारले. अक्षरने उत्तर दिले की तू गोलंदाजीत चमत्कार करतोस आणि मी फलंदाजीत करतो आहे. अशा प्रकारे आपण टीम इंडियाला आणखी विजय मिळवून देऊ, आणि आपला संघ पुढे घेऊन जाऊ.