ETV Bharat / sports

Swiss Open: भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयचे विजेतेपद हुकले; इंडोनेशियाच्या जोनाथनकडून पराभव

author img

By

Published : Mar 27, 2022, 10:48 PM IST

भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयचे ( Indian Badminton player HS Pranoy ) स्विस ओपन सुपर ३००चे विजेतेपद हुकले आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रणॉयला इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीकडून 12-21, 18-21 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.

HS Pranoy
HS Pranoy

बासेल : भारतीय बॅडमिंटन खेळाडू एचएस प्रणॉयला रविवारी स्विस ओपन सुपर 300 ( Swiss Open Super 300 ) स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रणॉयला इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचे ( Jonathan Christie of Indonesia ) आव्हान पेलता आले नाही. 48 मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयला चौथ्या मानांकित खेळाडूकडून 12-21, 18-21 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. भारतीय खेळाडू प्रणॉय पाच वर्षांत पहिल्यांजाच अंतिम सामना खेळत होता.

You can keep your head high @PRANNOYHSPRI, you did well & we are proud of you 💪

Congratulations 👏#SwissOpen2022#Badminton pic.twitter.com/Y4TnX8RsRb

— BAI Media (@BAI_Media) March 27, 2022

तिरुवनंतपुरममधील 29 वर्षीय खेळाडूला 2018 मध्ये 'गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स' रोग आणि कोविड-19 संसर्गामुळे अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागले. या स्पर्धेदरम्यान सुरेख फॉर्ममध्ये असलेल्या प्रणॉयला ( Badminton player HS Pranoy ) रविवारी जोनाथनच्या अचूकतेची आणि तग धरण्याची बरोबरी साधता आली नाही. प्रणॉयने सामन्याच्या सुरुवातीला जोनाथनला 5-5 आणि 8-8 अशी बरोबरी साधून झुंज दिली. मात्र, त्यानंतर जोनाथनने भारतीय खेळाडूला पहिल्या गेममध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. प्रणॉय चुका करत असताना जोनाथनने दबाव कायम ठेवला.

दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण गुणसंख्या 7-7 अशी बरोबरीत आणली. जोनाथनने मात्र ब्रेकमध्ये 11-7 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर प्रणॉयने पुन्हा एकदा पुनरागमन करत स्कोअर 13-13 अशी बरोबरी केली. पण जोनाथनने भारतीय खेळाडूची लय मोडून 19-14 अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर सामना जिंकला.

हेही वाचा - IPL 2022 MI v DC: दिल्लीने 4 विकेट्सने मुंबईला पाजले पराभवाचे पाणी; ललित-अक्षरची 75 धावांची अतूट भागीदारी

बासेल : भारतीय बॅडमिंटन खेळाडू एचएस प्रणॉयला रविवारी स्विस ओपन सुपर 300 ( Swiss Open Super 300 ) स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रणॉयला इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचे ( Jonathan Christie of Indonesia ) आव्हान पेलता आले नाही. 48 मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणॉयला चौथ्या मानांकित खेळाडूकडून 12-21, 18-21 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. भारतीय खेळाडू प्रणॉय पाच वर्षांत पहिल्यांजाच अंतिम सामना खेळत होता.

तिरुवनंतपुरममधील 29 वर्षीय खेळाडूला 2018 मध्ये 'गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स' रोग आणि कोविड-19 संसर्गामुळे अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागले. या स्पर्धेदरम्यान सुरेख फॉर्ममध्ये असलेल्या प्रणॉयला ( Badminton player HS Pranoy ) रविवारी जोनाथनच्या अचूकतेची आणि तग धरण्याची बरोबरी साधता आली नाही. प्रणॉयने सामन्याच्या सुरुवातीला जोनाथनला 5-5 आणि 8-8 अशी बरोबरी साधून झुंज दिली. मात्र, त्यानंतर जोनाथनने भारतीय खेळाडूला पहिल्या गेममध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. प्रणॉय चुका करत असताना जोनाथनने दबाव कायम ठेवला.

दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण गुणसंख्या 7-7 अशी बरोबरीत आणली. जोनाथनने मात्र ब्रेकमध्ये 11-7 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर प्रणॉयने पुन्हा एकदा पुनरागमन करत स्कोअर 13-13 अशी बरोबरी केली. पण जोनाथनने भारतीय खेळाडूची लय मोडून 19-14 अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर सामना जिंकला.

हेही वाचा - IPL 2022 MI v DC: दिल्लीने 4 विकेट्सने मुंबईला पाजले पराभवाचे पाणी; ललित-अक्षरची 75 धावांची अतूट भागीदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.