सातारा : हरियाणातील पंचकुला येथे सुरु असलेल्या खेलो इंड़िया यूथ स्पर्धेत सुदेष्णा शिवणकर हिने सुवर्णपदकांची हॅटट्रिक ( Sudeshna Shivankar gold medal hat trick ) केली आहे. 100 मीटर, 4 बाय 100 रिले प्रकारासह 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने सुवर्णपदके पटकावली आहेत. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे सातार्याचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
-
Sudeshna Shivankar (283) and Avantika Narale claim another 1-2 for #Maharashtra in the #KIYG2021 Women's 200m final#KheloIndia #UmeedSeYakeenTak@ddsportschannel @Dream11 pic.twitter.com/JAWy04ldbh
— Khelo India (@kheloindia) June 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sudeshna Shivankar (283) and Avantika Narale claim another 1-2 for #Maharashtra in the #KIYG2021 Women's 200m final#KheloIndia #UmeedSeYakeenTak@ddsportschannel @Dream11 pic.twitter.com/JAWy04ldbh
— Khelo India (@kheloindia) June 9, 2022Sudeshna Shivankar (283) and Avantika Narale claim another 1-2 for #Maharashtra in the #KIYG2021 Women's 200m final#KheloIndia #UmeedSeYakeenTak@ddsportschannel @Dream11 pic.twitter.com/JAWy04ldbh
— Khelo India (@kheloindia) June 9, 2022
सुदेष्णाची एकाच स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्ट्रीक -
हरियाणातील पंचकुलामध्ये चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्सचे ( Fourth Khelo India Youth Games ) आयोजन करण्यात आले आहे. दि. 3 जून ते 13 जून या दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खरशी (ता. जावली) गावची कन्या सुदेष्णा शिवणकर हिने वैयक्तिक कामगिरीतील सर्वोच्च 11:79 सेकंद अशी वेळ नोंदवत, 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. चार बाय 100 रिले प्रकारातही तिला सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुदेष्णाने 24:29 सेकंद अशी वेळ नोंदवत एकाच स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅटट्रिक पूर्ण केली आहे.
जावली एक्सप्रेस सुसाट, कोलंबिया स्पर्धेसाठी ठरली पात्र -
सातारा जिल्ह्यातील खरशी (ता. जावली) गावची कन्या सुदेष्णा हणमंत शिवणकर ( Sudeshna Hanmant Shivankar ) ही खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या अॅथलेटीक्स संघातून सहभागी झाली आहे. सलग तीन सुवर्णपदके पटकावल्याने जावली एक्सप्रेस सुदेष्णावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिने 100 मीटर स्पर्धेत 11.79 सेकंदाची उत्कृष्ट वेळ नोंदवल्याने कोलंबियात होणार्या जागतिक ज्युनिअर अॅथलेटीक्स स्पर्धेसाठी ती पात्र ठरली ( Eligible for World Junior Athletics Championships ) आहे.