ETV Bharat / sports

Badminton Competition: श्रीकांत, लक्ष्य यांनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीयमधून घेतली माघार

author img

By

Published : Jan 18, 2022, 11:43 AM IST

सात्विकसाईराज रँकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या पुरुष दुहेरी जोडीनेही या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दुहेरीतले स्पेशालिस्ट अश्विनी पोनप्पा आणि मनू अत्री यांनीही गेल्या आठवड्यात इंडिया ओपनमध्ये कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने माघार घेतली आहे.

Badminton
Badminton

नवी दिल्ली: अव्वल पुरुष एकेरी खेळाडू किदाम्बी श्रीकांत आणि इंडिया ओपन २०२२ चे विजेते लक्ष्य सेन यांनी रविवारी लखनौ येथे सुरू होणाऱ्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून (Syed Modi International Badminton Competition) माघार घेतली. शनिवारी इंडिया ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेली महिला अव्वल मानांकित पीव्ही सिंधू सुपर 300 सिरीज स्पर्धेत खेळणार आहे.

सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीनेही या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, तर दुहेरीतल्या स्पेशालिस्ट अश्विनी पोनप्पा आणि मनू अत्री यांनीही गेल्या आठवड्यात झालेल्या इंडिया ओपनमध्ये कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर माघार घेतली.

18-23 जानेवारी रोजी BWF वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अपलोड करण्यात आलेल्या पुरुष एकेरीच्या ड्रॉमध्ये श्रीकांत आणि लक्ष्य दोघेही नव्हते.

वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांतने इंडिया ओपन दरम्यान आयोजित अनिवार्य RT-PCR चाचणीमध्ये Covid-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तसेच पहिली फेरी खेळल्यानंतर त्याने माघार घेतली होती. सेनने इंडियन ओपननंतर आलेल्या थकव्यामुळे या स्पर्धेतून माघार घेण्याचे कारण सांगितले आहे.

रविवारी, डिसेंबरमध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारा लक्ष्य सेन (World Championships bronze medalist Lakshya Sen ) इंडिया ओपन 2022 च्या फायनलमध्ये पोहोचला. ज्यामध्ये त्याने सिंगापूरच्या विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन लोह कीन य्यूचा पराभव करून त्याचे पहिले BWF वर्ल्ड टूर सुपर 500 विजेतेपद जिंकले.

श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांच्या अनुपस्थितीत एचएस प्रणॉय आणि समीर वर्मा यांना दुखापतीमुळे इंडिया ओपनमधून माघार घ्यावी लागली, त्यामुळे या स्पर्धेत भारताच्या आशेवर पाणा फेरले आहे. महिला विभागात, इंडिया ओपनची उपविजेती थायलंडची सुपानिदा कातेथॉंग रिंगणात आहे. पण तिची देशबांधव बुसानन ओंगबामरुंगफान इंडियन ओपनची विजेती (Busanan Ongbamarungphan Indian Open winner) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.