नवी दिल्ली - महिला क्रिकेटर स्मृति मंधाना आणि टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रीडा मंत्री किरन रिजिजू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
गेल्या वर्षी 25 सप्टेंबरला राष्ट्रपती भवनामध्ये खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला गेला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत व्यस्त असल्या कारणामुळे या दोघांना हा पुरस्कार घेता आला नव्हता. स्मृति मंधाना ही भारतीय महिला क्रिकेट संघाची प्रमुख खेळाडू म्हणून ओळखली जाते. टी -20 आंतरराष्ट्रीय स्तरावर ती सर्वात कमी वयाची कर्णधार आहे. याच वर्षामध्ये स्मृतिने जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांक मिळवला होता.
-
Shri @KirenRijiju, Minister YAS, presented #ArjunaAwards to the ace Indian women cricketer @mandhana_smriti and star tennis player @rohanbopanna for the year 2018 today at New Delhi. Congratulations to you both! 🎉👏👏 pic.twitter.com/C9LGHgrtVr
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) July 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shri @KirenRijiju, Minister YAS, presented #ArjunaAwards to the ace Indian women cricketer @mandhana_smriti and star tennis player @rohanbopanna for the year 2018 today at New Delhi. Congratulations to you both! 🎉👏👏 pic.twitter.com/C9LGHgrtVr
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) July 16, 2019Shri @KirenRijiju, Minister YAS, presented #ArjunaAwards to the ace Indian women cricketer @mandhana_smriti and star tennis player @rohanbopanna for the year 2018 today at New Delhi. Congratulations to you both! 🎉👏👏 pic.twitter.com/C9LGHgrtVr
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) July 16, 2019
2018 मध्ये आयसीसीची महिला खेळाडू ठरलेल्या स्मृतिने 12 एकदिवसीय सामन्यात 669 धावा बनवल्या आहेत. शिवाय, 25 टी-20 सामन्यात 622 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, 2018 च्या आशियाई स्पर्धेच्या दुहेरीमध्ये रोहन बोपन्नाने सुवर्णपदक जिंकले आहे.