मुंबई - कोरोना महामारीत बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने असंख्य गरजूंची मदत केली. त्याचे हे कार्य अद्याप अविरत सुरू आहे. सोनूने आता आणखी एका व्यक्तीला मदत केली आहे. त्याने केलेल्या या कार्याचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे. सोनू आणि त्याची सूद फाउंडेशन संस्थेने एका नेमबाजाला महागडी रायफल घेऊन दिली आहे.
सोनू सूद याने मदत केलेली नेमबाज ही झारखंडची असून तिचे नाव कोनिका लायक असे आहे. काही दिवसांपूर्वी कोनिका लायक हिने ट्विट केले होते. त्यात तिने, मी ११व्या झारखंड राज्य रायफल नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तरीही सरकारकडून मला काहीच मदत मिळत नाही. मला एक रायफल घेऊन देऊन मदत करा, असे आवाहन केले होते. कोनिकाने या ट्विटमध्ये सोनू सूदला टॅग केले होते.
कोनिका लायकच्या ट्विटला सोनू सूद याने मार्च महिन्यात उत्तर देत, तुला लवकरच नविन रायफल मिळेल, असे आश्वासन दिले होते. आज सोनू सूदने दिलेले आश्वासन पाळले आहे. त्याने कोनिका लायकसाठी एक नविन रायफल पाठवली आहे.
रायफल मिळाल्यानंतर कोनिकाने ट्विट केले आहे. सर माझी रायफल आली आहे. यामुळे माझा परिवार खूप खुश आहे आणि संपूर्ण गाव तुम्हाला आशिर्वाद देत आहे, असे कोनिकाने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कोनिकाच्या या ट्विटला देखील सोनू सूदने उत्तर दिले. त्याने, ऑलिम्पिकमध्ये भारताचे सुवर्णपदक पक्के झाले आहे. आता फक्त प्रार्थनेची गरज आहे, असे म्हटलं आहे.
-
इंडिया का ओलंपिक मेडल पक्का 🏅
— sonu sood (@SonuSood) June 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
बस अब दुआओं की जरूरत.@SoodFoundation 🇮🇳 https://t.co/NkoRkDfvAx
">इंडिया का ओलंपिक मेडल पक्का 🏅
— sonu sood (@SonuSood) June 26, 2021
बस अब दुआओं की जरूरत.@SoodFoundation 🇮🇳 https://t.co/NkoRkDfvAxइंडिया का ओलंपिक मेडल पक्का 🏅
— sonu sood (@SonuSood) June 26, 2021
बस अब दुआओं की जरूरत.@SoodFoundation 🇮🇳 https://t.co/NkoRkDfvAx
दरम्यान, कोनिका राष्ट्रीय स्पर्धेसाठी दोन वेळा पात्र ठरलेली नेमबाज आहे. पण तिला नेमबाजीच्या सरावासाठी प्रशिक्षक किंवा मित्रमैत्रीणींकडून रायफल मागावी लागत होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला स्वत: रायफल खरेदी करता येणे शक्य नव्हते. यामुळे तिने सोनू सूदला हाक दिली होती. सोनू देखील कोनिकाच्या मदतीला देवदुतासारखा धावून आला आहे.
हेही वाचा - WI vs SA ३rd T२०: अखेरच्या चेंडूवर षटकार आणि श्वास रोखून धरायला लावणारे ६ चेंडू
हेही वाचा - ICC Rankings : स्टिव्ह स्मिथला धक्का देत केन विल्यमसन पहिल्या स्थानावर, जाणून घ्या विराटची क्रमवारी