ETV Bharat / sports

प्रो कबड्डी : सातव्या मोसमात एकाच संघाकडून खेळणार मराठमोळे देसाई बंधू

author img

By

Published : Apr 9, 2019, 8:55 PM IST

सूरजला १० लाखांच्या बोलीवर टायटन्सने दाखल करुन घेतले आपल्या संघात

देसाई बंधू

मुंबई - प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमासाठी झालेल्या लिलावात कोल्हापूरच्या सिद्धार्थ आणि सूरज देसाई या बंधूंना एकाच संघाकडून खरेदी करण्यात आले आहे. तेलुगू टायटन्स संघाने या दोन्ही खेळाडूंना खरेदी करत आपल्या ताफ्यात घेतल्याने हे दोन्ही बंधू आता एकाच संघात खेळताना दिसणार आहेत.

पहिल्या दिवशी झालेल्या लिलावात सिद्धार्थला तेलुगू टायटन्सने १ कोटी ४५ लाखांची बोली लावत आपल्याकडे घेतले. तर आज सिद्धार्थचा मोठा भाऊ सूरजलाही टायटन्सने १० लाखांच्या बोलीवर आपल्या संघात दाखल करुन घेतले आहे. या २ मराठी पठ्ठ्यांना एकाच वेळी प्रो कबड्डी लीगमध्ये खेळताना पाहण्यासाठी कोल्हापूरसह पूर्ण महाराष्ट्र आतुर असणार आहे.

सहाव्या मोसमात सिद्धार्थने यू मुम्बाकडून खेळताना जबरदस्त कामगिरी करत सर्वोत्कृष्ट उदयोनमुख खेळाडूचा मान मिळवला होता. त्याचाच फायदा त्याला लिलावात होताना पाहायला मिळाला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.