नवी दिल्ली : हॉकी इंडियाने सोमवारी वीकेंडच्या सामन्यांसाठी 22 जणांच्या संघाची घोषणा ( Hockey India announces 22-man squad ) केली आहे, ज्यात झारखंडमधील आशादायी युवा फॉरवर्ड संगीता कुमारीचा समावेश आहे, जिने ज्युनियर इंडियासह तिच्या कार्यकाळात छाप पाडली आहे. भारतीय महिला हॉकी संघाची गोलकीपिंग लीजेंड सविता संघाचे नेतृत्व करेल ( Legend Savita will lead the team ), तर दीप ग्रेस एक्का 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी भुवनेश्वर, ओडिशा येथे स्पेन विरुद्ध FIH प्रो लीग सामन्यांमध्ये उपकर्णधार असेल.
-
Hockey India name 22-member women's squad for matches against Spain
— ANI Digital (@ani_digital) February 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story https://t.co/h373E6zRp0#Hockey pic.twitter.com/sHHJKqz5Bv
">Hockey India name 22-member women's squad for matches against Spain
— ANI Digital (@ani_digital) February 21, 2022
Read @ANI Story https://t.co/h373E6zRp0#Hockey pic.twitter.com/sHHJKqz5BvHockey India name 22-member women's squad for matches against Spain
— ANI Digital (@ani_digital) February 21, 2022
Read @ANI Story https://t.co/h373E6zRp0#Hockey pic.twitter.com/sHHJKqz5Bv
मुख्य कोच जेनेके शोपमॅन ( Head Coach Jenke Shopman ) म्हणाले, ते नवीन खेळाडूंनी दाखवलेल्या प्रदर्शनामुळे खुश आहेत. स्पेनविरुद्ध आमचे देशांतर्गत प्रो लीग ( Domestic Pro League ) खेळ सुरू करण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. ओमानहून परतल्यानंतर आमचे दोन आठवडे चांगला सराव झाला आणि मला खात्री आहे की निवडलेले 22 खेळाडू हे ते स्पेनविरुद्ध काय करू शकतात हे दाखवण्यासाठी तयार असतील. जेव्हा तुमच्याकडे खेळाडूंचा मोठा समूह असतो, तेव्हा संघ निवडणे नेहमीच कठीण होते. पण नवीन खेळाडू खूप प्रगती करत आहेत, हे पाहून मला आनंद होत आहे.
ते म्हणाले, "स्पेन एक मजबूत प्रतिस्पर्धी ( Spain is a strong competitor ) आहे, त्यांनी सातत्याने उच्च स्तरावर कामगिरी केली आहे, केवळ टोकियोमधील उपांत्य फेरीत मुकावे लागले आणि गेल्या विश्वचषकात कांस्यपदक जिंकले. ते बचावावर खेळतात, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध चांगली स्पर्धा करण्यासाठी आम्हाला आमचा वेग आणि कौशल्य आणि मजबूत बचाव वापरायचा आहे.
भारताचा 22 सदस्यीय ताफा -
गोलरक्षक : सविता (कर्णधार), बिचू देवी खारीबम आणि रजनी एथिमारपू.
बचावपटू : दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता आणि इशिका चौधरी.
मिडफिल्डर : निशा, सलीमा टेटे, सुशीला चानू पुखरंबम, ज्योती, मोनिका, नेहा, नवज्योत कौर आणि नमिता टोप्पो.
फॉरवर्डः वंदना कटारिया, शर्मिला देवी, नवनीत कौर, लालरेमसियामी, संगीता कुमारी आणि राजविंदर कौर.
राखीव खेळाडू : रश्मिता मिंज, अक्षता अब्सो ढाकले, सोनिका, मारियाना कुजूर आणि ऐश्वर्या राजेश चव्हाण