नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आता या आयपीएल 2023 मध्ये नवीन जर्सीमध्ये दिसणार आहे. त्यामुळे विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांच्या उपस्थितीत आरसीबीसाठी संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे. आरसीबीच्या या नवीन जर्सीसह, सर्व खेळाडूंचा नवा लूक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या हंगामात, आरबीसी संपूर्ण बदलांसह आणि पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.
आरसीबीची पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरण्याची तयारी : आयपीएलआधीच सर्व फ्रँचायझींचे खेळाडू त्यांच्या संघात सामील झाले आहेत आणि काही संघ सामील होत आहेत. यावेळी आरसीबीने पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिससह आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली यांनी नवीन जर्सी लाँच केली. आरसीबी आयपीएलमधील पहिल्या विजेतेपदासाठी लढणार आहे. त्याच वेळी, आरसीबीची नवीन जर्सी पाहून चाहते खूप आकर्षित होत आहेत.
-
We are thrilled to announce and unveil a long term association with @qatarairways as the main principal partner of RCB. 🤝
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Fasten your seatbelts for an unforgettable journey!#PlayBold #ನಮ್ಮRCB #RCBxQatarAirways pic.twitter.com/r1qzYLcZ4M
">We are thrilled to announce and unveil a long term association with @qatarairways as the main principal partner of RCB. 🤝
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 26, 2023
Fasten your seatbelts for an unforgettable journey!#PlayBold #ನಮ್ಮRCB #RCBxQatarAirways pic.twitter.com/r1qzYLcZ4MWe are thrilled to announce and unveil a long term association with @qatarairways as the main principal partner of RCB. 🤝
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 26, 2023
Fasten your seatbelts for an unforgettable journey!#PlayBold #ನಮ್ಮRCB #RCBxQatarAirways pic.twitter.com/r1qzYLcZ4M
विराट कोहलीचे चाहते आयपीएलसाठी आतुर : आता विराट कोहलीचे चाहते आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण लोकांना आपल्या आवडत्या स्टार फलंदाजाला या नवीन जर्सीत चमकदार कामगिरी करताना पाहायचे आहे. लोकांना विराट कोहलीवर खूप आशा आहेत. आरसीबीचे दोन मोठे क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलही यात सामील झाले आहेत. आयपीएलचा 16वा सीझन आता नव्या कर्णधारासोबत खेळणार आहे.
दिग्गज क्रिकेटपटू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये उपस्थित : आरसीबी ट्रॉफीच्या प्रतीक्षेत आहे दिग्गज क्रिकेटपटू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये उपस्थित आहेत. मात्र यानंतरही आरसीबीला अद्याप आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. आयपीएलची पहिली ट्रॉफी मिळवण्यासाठी आरसीबी सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्याचबरोबर विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपदही बराच काळ सांभाळले आहे. पण यावेळी आरसीबी आपला नवा कर्णधार दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा : Sanjay Shirsat on Sanjay Raut : 'संजय राऊत रोज सकाळी बडबडतात, राज ठाकरे एकदाच पण लाखातला शब्द बोलतात'