इंदूर : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने भारत आणि न्यूझीलंड मालिकेतील तिसरा आणि शेवटच्या सामन्यात शुभमन गिलसोबत धमाकेदार खेळी केली. यासोबतच 'हिटमॅन' रोहित शर्माने यासोबत एक विक्रमसुद्धा मोडला आहे. रोहित शर्माने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचा वनडे कारकिर्दीतील षटकार ठोकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. सनथ जयसूर्याने आपल्या वनडे कारकिर्दीत 270 षटकार ठोकले होते. तर रोहित शर्माने 273 षटकार मारून जयसूर्याचा विक्रम मोडला आहे.
रोहितने विक्रम मोडून केला विक्रम : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने 398 एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 351 षटकार मारून प्रथम क्रमांक मिळवला. यानंतर वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 301 एकदिवसीय सामन्यांमध्ये 331 षटकार मारले. तर श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या ४४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २७० षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पण 'हिटमॅन' रोहित शर्माने जयसूर्याचा विक्रम मोडून तिसरे स्थान पटकावले आहे.
-
𝗖𝗘𝗡𝗧𝗨𝗥𝗬! 🔥
— BCCI (@BCCI) January 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Talk about leading from the front! 🙌🏻
A magnificent century from #TeamIndia captain @ImRo45 💯
Follow the match ▶️ https://t.co/ojTz5RqWZf…#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/iR3IJH3TdB
">𝗖𝗘𝗡𝗧𝗨𝗥𝗬! 🔥
— BCCI (@BCCI) January 24, 2023
Talk about leading from the front! 🙌🏻
A magnificent century from #TeamIndia captain @ImRo45 💯
Follow the match ▶️ https://t.co/ojTz5RqWZf…#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/iR3IJH3TdB𝗖𝗘𝗡𝗧𝗨𝗥𝗬! 🔥
— BCCI (@BCCI) January 24, 2023
Talk about leading from the front! 🙌🏻
A magnificent century from #TeamIndia captain @ImRo45 💯
Follow the match ▶️ https://t.co/ojTz5RqWZf…#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/iR3IJH3TdB
85 चेंडूत 101 धावां: इंदूरच्या सामन्यात रोहित शर्माने 85 चेंडूत 101 धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 118.82 होता. रोहितने या सामन्यात 9 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याचवेळी शुभमन गिलनेही रोहित शर्माला पूर्ण साथ दिली. दोघांमध्ये 212 धावांची भागीदारी झाली. 212 धावांवर रोहित शर्माच्या रूपाने पहिली विकेट पडली.
गिलची शतकी खेळी : यानंतर शुभमन गिलनेही आपले शतक पूर्ण करताना 78 चेंडूत 112 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 5 षटकार मारले. यादरम्यान गिलचा स्ट्राइक रेट 143.58 होता. तत्पूर्वी, किवी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांचा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.