ETV Bharat / sports

जिल्हा क्रीडा विभागाचा प्रताप, तालुकास्तरीय शालेय स्पर्धेसाठी दिले दगडांनी भरलेले मैदान - यवतमाळ जिल्ह्यातील बातम्या

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ तालुक्यात शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दाते डीएड कॉलेजच्या इनडोअर हॉलमध्ये खेळवण्यात येत आहे. मात्र, या इनडोअर हॉलमध्ये असलेले मैदान लहान-लहान खड्यांनी भरलेले आहे.

मैदानावरिल खडे वेचताना विद्यार्थी
author img

By

Published : Sep 14, 2019, 10:41 PM IST

Updated : Sep 14, 2019, 11:31 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यामध्ये शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मात्र, १४ वर्षे वयोगटातील खेळाडूंना निकृष्ठ मैदानामुळे नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. आयोजकांनी लहान-लहान खड्यांनी भरलेले मैदान उपलब्ध करुन दिल्याने, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी 'त्या' मैदानावर सामना खेळण्यास नकार दिला. यामुळे आयोजकांना स्पर्धा पुढे ढकलण्याची वेळ आली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ तालुक्यात शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दाते डीएड कॉलेजच्या इनडोअर हॉलमध्ये खेळवण्यात येत आहे. मात्र, या इनडोअर हॉलमध्ये असलेले मैदान लहान-लहान खड्यांनी भरलेले आहे.

जिल्हा क्रीडा विभागाच्या कारभारावर प्रतिक्रिया देताना विद्यार्थी...

हेही वाचा - 'संपर्क तुटला, संकल्प नाही'; यवतमाळमध्ये गणपतीची आरास सजली चांद्रयानच्या देखाव्याने

मैदानाची स्थिती पाहून विद्यार्थ्यांनी सामना खेळण्यास नकार दिला. तर तालुक्यातून आलेल्या शिक्षकांनीही मैदान पाहताच सामना खेळताना विद्यार्थी जखमी झाला तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल केला आणि सामना न खेळण्याचा निर्धार केला. खेळण्यायोग्य मैदान उपलब्ध करून दिल्यानंतरच विद्यार्थ्यी मैदानात उतरतील असा आक्रमक पवित्रा शिक्षकांनी घेतला. यामुळे आयोजकांना शेवटी ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली.

हेही वाचा - VIDEO : बैल जेव्हा उधळतो.. पाहा यवतमाळच्या पोळ्यातील बैलाचा थरार

दरम्यान, या स्पर्धेसाठी यवतमाळ तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने आले होते. मात्र, आयोजकांकडून निकृष्ठ दर्जाने मैदान उपलब्ध करुन दिल्याने, विद्यार्थांच्या हिरमोड झाला. विद्यार्थ्यांनी मैदानावरिल लहान दगड गोळा केली. मात्र, अख्खे मैदानभर दगड पसरल्याने, सामना न खेळणेच विद्यार्थ्यांनी पसंत केले.

Intro:Body:यवतमाळ : मैदानी खेळ असलेला कबड्डी सामना हा लाल मातीत खेळवला जातो. मात्र, यवतमाळ तालुक्यातील 14 वर्षे वयोगटात खालील शालेय तालुकास्तरीय कबड्डीचा सामना हा बारीक दगड असलेल्या मैदानामध्ये खेळविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे मैदान पाहताच विद्यार्थ्यांनी इथे खेळण्यास नकार दिला. तर तालुक्यातून आलेल्या शिक्षकांनीही मैदान बघतात याठिकाणी सामना खेळताना विद्यार्थी जखमी झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न करीत या ठिकाणी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने यवतमाळ तालुक्यातील शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. दाते डीएड कॉलेजच्या इनडोअर हॉलमध्ये घेण्यात आलेली या स्पर्धेमध्ये खेळाचे मैदान बघतात विद्यार्थ्यांनी याठिकाणी खेळण्यास नकार दिला. सकाळी नऊ वाजता पासून याठिकाणी तालुक्‍यातील शाळेचे विद्यार्थी कबड्डीचे सामने खेळण्यासाठी आले होते. मात्र, याठिकाणी येताच सुरुवातीला विद्यार्थ्यांनाच या मैदानावरील बारीक दगड वेचण्याची वेळ आली. मात्र या ग्राउंड वरती खेळल्यास विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत होत असल्याने पालकांनी याठिकाणी येऊन इथे खेळण्यास नकार दिला. विद्यार्थ्यांसोबत आलेल्या शिक्षकांनी हे मैदान कबड्डी साठी उपयुक्त नसल्याचे सांगितले. सामने खेळल्यास विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्यास संयोजकांनी आमची जबाबदारी नसून ही जबाबदारी शिक्षकांची असल्याचे स्पष्ट केले. तर शिक्षकांनी ही आमची जबाबदारी नसून उपयुक्त मैदान उपलब्ध करून द्या तरच विद्यार्थ्यांना कबड्डीचे सामने खेळू असा आक्रमक पवित्रा घेतला. शेवटी हे सामने पुढे ढकलण्यात आले.

बाइट - संजय सातारकर, पंच तथा क्रीडा तज्ञ
बाइट - प्रवीण वानखडे, पालक
बाइट- सुमेद वानखडे, विद्यार्थी(स्पर्धेक)
बाइट - यश कोडापे, विद्यार्थी(स्पर्धेक)Conclusion:
Last Updated : Sep 14, 2019, 11:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.