मुंबई - अत्यंत रोमहर्षक झालेल्या प्रो कबड्डीच्या सामन्यात पाटणा पायरेट्सने एका गुणाने तामिळ थलायवाजचा पराभव केला. हा सामना पाटणा पायरेट्सने २४-२३ ने खिशात घातला. स्टार कबड्डीपटू आणि तामिळ थलायवाजकडून खेळणाऱ्या राहुल चौधरीने या सामन्यात मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
राहुलने या सामन्यात खेळताना प्रो कबड्डीमध्ये नवा इतिहास रचला आहे. तो कबड्डीमध्ये ९०० गुण मिळवणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. राहुलने पाटणाविरुद्ध खेळताना १४ रेडमध्ये ५ गुण मिळवले. हा विक्रम रचण्यासाठी राहुलला १०३ सामने खेळावे लागले आहेत. सर्वाधिक रेडींग मिळवण्याच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ८४६ गुण रेडींगमध्ये मिळवले आहेत.
-
The first man to reach -
— Tamil Thalaivas (@tamilthalaivas) July 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
200 ✔
300 ✔
400 ✔
500 ✔
600 ✔
700 ✔
800 ✔
AND NOW 900 points ✔
Another milestone for the Showman Rahul Chaudhari as he continues his fine form in the #VivoProKabbadi League!#IdhuNammaAatam pic.twitter.com/rakKHLf5Gd
">The first man to reach -
— Tamil Thalaivas (@tamilthalaivas) July 30, 2019
200 ✔
300 ✔
400 ✔
500 ✔
600 ✔
700 ✔
800 ✔
AND NOW 900 points ✔
Another milestone for the Showman Rahul Chaudhari as he continues his fine form in the #VivoProKabbadi League!#IdhuNammaAatam pic.twitter.com/rakKHLf5GdThe first man to reach -
— Tamil Thalaivas (@tamilthalaivas) July 30, 2019
200 ✔
300 ✔
400 ✔
500 ✔
600 ✔
700 ✔
800 ✔
AND NOW 900 points ✔
Another milestone for the Showman Rahul Chaudhari as he continues his fine form in the #VivoProKabbadi League!#IdhuNammaAatam pic.twitter.com/rakKHLf5Gd
राहुल पाठोपाठ पाटणाच्या प्रदीप नरवालने यादीत स्थान मिळवले आहे. त्याने ८८ सामन्यात ८८३ गुण कमावले आहे.
प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वाधिक गुण मिळवणारे खेळाडू -
१.राहुल चौधरी (१०३ सामने)- ९००
२.परदीप नरवाल (८८ सामने)- ८८३
३.दीपक हुडा (१०५ सामने)- ८०२
४.अजय ठाकूर (१०५ सामने)- ७६५
५.रोहित कुमार (७५ सामने)- ६२०