ETV Bharat / sports

Rafel Nadal Emotional Post : फेडररसाठी भावूक झाला नदाल, म्हणाला- हा दिवस कधीही....!

रॉजर फेडरर ( Swiss tennis star Roger Federer ) हा जगातील तिसरा सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेता आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 20 ग्रँडस्लॅम जिंकले.

Rafel and Roger
राफेल आणि रॉजर
author img

By

Published : Sep 17, 2022, 12:27 PM IST

लंडन : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल ( Spanish tennis legend Rafael Nadal ) याने रॉजर फेडररच्या निवृत्तीवर एक भावनिक ट्विट केले ( Nadal emotional tweet on Roger Federer retirement ) आहे. नदालने ट्विटरवर लिहिले, “प्रिय रॉजर, माझा मित्र आणि प्रतिस्पर्धी, हा दिवस कधीही येऊ नये अशी माझी इच्छा आहे. वैयक्तिकरीत्या माझ्यासाठी आणि खेळासाठी हा दुःखद दिवस आहे. कोर्ट इतकी वर्षे तुझ्यासोबत शेअर करणे हा केवळ आनंदच नाही तर माझ्यासाठी सन्मान राहिला आहे.

स्विस टेनिस स्टार रॉजर फेडररने 15 सप्टेंबर रोजी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा ( Roger Federer retirement from professional tennis ) केली. तसेच पुढील आठवड्यात लंडनमधील लेव्हर कप ही त्याची "विदाई स्पर्धा" असेल असे सांगितले. फेडररने वयाच्या 41 व्या वर्षी टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. 20 ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकणारा फेडरर जुलै 2021 मध्ये विम्बल्डनमध्ये खेळल्यापासून कोर्टवर हजर झालेला नाही. यानंतर त्याच्या गुडघ्याच्या अनेक शस्त्रक्रिया झाल्या.

  • Dear Roger,my friend and rival.
    I wish this day would have never come. It’s a sad day for me personally and for sports around the world.
    It’s been a pleasure but also an honor and privilege to share all these years with you, living so many amazing moments on and off the court 👇🏻

    — Rafa Nadal (@RafaelNadal) September 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फेडररने ट्विटरवर पोस्ट ( Rafael Nadal Twitter post ) केले की, लंडनमध्ये पुढील आठवड्यात होणारी लेव्हर कप ही त्याची शेवटची व्यावसायिक स्पर्धा असेल. त्याच्या व्यवस्थापन कंपनीने आयोजित केलेला हा सांघिक कार्यक्रम आहे. यूएस ओपन संपल्यानंतर ही बातमी आली आहे. फेडरर जगातील सर्वात जास्त ग्रँडस्लॅम जिंकणारा तिसरा टेनिसपटू आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 20 ग्रँडस्लॅम जिंकले आहे. यामध्ये सहा ऑस्ट्रेलियन ओपन, एक फ्रेंच ओपन, आठ विम्बल्डन आणि पाच यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे.

हेही वाचा - Roger Federer Retirement : रॉजर फेडररने बॉल बॉय म्हणून केली होती कारकिर्दीची सुरुवात, पाहा त्याचे विक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.