ETV Bharat / sports

India Open 2023 इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात, या दिग्गज खेळाडूंवर असेल सगळ्यांची नजर - इंडीया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2023

इंडिया ओपन स्पर्धेचा बिगुल आजपासून दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडीयममध्ये वाजणार आहे. या स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूंचा सलामीचा सामना थायलंडच्या सुपानिडा कटेथोंगसोबत होणार आहे. मागच्यावर्षी याच स्पर्धेत सुपानिडाने पी व्ही सिंधूवर मात केली होती. त्यामुळे या स्पर्धेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तर टॉप दहा खेळाडूंच्या कामगिरीवरही देशभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे.

India Open 2023
पी व्ही सिंधू
author img

By

Published : Jan 17, 2023, 3:28 PM IST

नवी दिल्ली - जगभरातील खेळाडूंचे लक्ष लागून असलेल्या इंडिया ओपन स्पर्धेला आजपासून दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडीयममध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी चीन, जपानसह देशभरातील खेळाडू विजयी पताका फडकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारताची स्टार खेळाडू पी व्ही सिंधूदेखील या वर्षातील आपली विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील वर्षी पी व्ही सिंधुला थायलंडच्या सुपानिडा कटेथोंगकडून सेमिफायनलमध्ये हार पत्करावी लागली होती. इंडिया ओपन स्पर्धेत मात्र सुपानिडा कटेथोंगसोबतचा सिंधूचा सलामीचा सामना रंगणार आहे.

पी व्ही सिंधूचा पहिला सामना होणार सुपानिडा कटेथोंगसोबत - पी व्ही सिंधूचा आज महिला एकेरीतील सलामीचा सामना थायलंडच्या सुपानिडा कटेथोंगसोबत होणार आहे. पी व्ही सिंधूला मागील वर्षी थायलंडच्या सुपानिडा कटेथोंगने सेमीफायनलमध्ये हरवले होते. मात्र सोमवारी पी व्ही सिंधूने घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत छेडले असता, पी व्ही सिंधूने पराभवाचा वचपा काढल्याचे स्पष्ट केले. आपल्या काही चुका झाल्या होत्या, त्यावर काही नवीन काम सुद्धा केल्याचे पी व्ही सिंधूने स्पष्ट केले. या नवीन मालिकेत तुम्हाला ते बदल स्पष्टपणे दिसतील असेही पी व्ही सिंधूने यावेळी बोलताना सांगितले.

या दहा खेळाडूवर राहणाणार सगळ्यांच्या नजरा

1) अकने यामागुची ( Akane Yamaguchi ) - जपानची स्टार खेळाडू अकने यामागुची ही इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील प्रमुख दावेदार मानली जाते. अकने यामागुचीने आतापर्यंत सलग दोन जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यात 2021 आणि 2022 मध्ये तिने जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहेत. तसेच तिने इंग्लंड ओपन स्पर्धा, जपान ओपन स्पर्धेसह एशियन चाम्पियनशीपमध्ये पदक जिंकले आहे. अकने यामागुचीने उत्कृष्ट खेळ करत मलेशिया ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठून यावर्षीची धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यासह अकने यामागुची इंडिया ओपन स्पर्धेत चमकदार खेळी करत आपली विजयी पताका फडकवत ठेवण्याचा प्रयत्न करेल.

2) चेन युफेई - चीनच्या चेन युफेईने भारतात पाऊल ठेवले तेच इंडिया ओपन स्पर्धेत विजयी पताका फडकावून नवीन वर्षाची नवी सुरुवात करण्यासाठी. चेन युफेई ही 2022 मध्ये बीडब्लूएफ जागतिक स्पर्धेत हारल्यामुळे नैराश्याने ग्रासली होती. त्यानंतरही ती सुपर 300, सुपर 500 आणि सुपर 750 स्पर्धेत हरली होती. मागील वर्षी तर युफेईला अकने यामागुचीने हरवले होते. त्यामुळे जागतिक स्तरावरील दोन क्रमांकाची खेळाडू या स्पर्धेत कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

3) अॅन से यांग ( साऊथ कोरिया ) - साऊथ कोरियाची स्टार बॅडमिंटनपटू म्हणून अॅन से यांगचा उल्लेख करण्यात येतो. मोस्ट प्रॉमीसिंग प्लेअर ऑफ दर इयर म्हणून तिचा बीडब्लूएफ स्पर्धेत गौरव करण्यात आला होता. तिच्याकडे आतापर्यंत 11 बीडब्लूएफ पदके आहेत, तर पाच उपविजेते पदावरही तिने आपले नाव कोरले आहे. जागतिक पातळीवरची चौथ्या क्रमांकावरची खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. या स्पर्धेतही ती चांगली खेळी करण्यासाठी सज्ज झाली आहे.

4) पी व्ही सिंधू - भारताची सुप्रसिद्ध बॅटमिंटन खेळाडू म्हणून पी व्ही सिंधूचा नावलौकिक आहे. 27 वर्षाच्या पी व्ही सिंधूने जागतिक पातळीवरील अनेक पदकांवर आपले नाव कोरले आहे. पी व्ही सिंधूने दोन वेळा इंडिया ओपन स्पर्धा जिंकली आहे. पी व्ही सिंधूने दोन वेळा वर्ल्ड चाम्पियनशीप स्पर्धेची पदके आपल्या खिशात घातली आहेत. तर तब्बल पाच वेळा तिने महिला एकेरीची विजेतेपद पटकावले आहे. मागच्या वर्षी पी व्ही सिंधूने कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्णपदक पटकावले होते. आता तर दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडीयमवर पी व्ही सिंधूला मायदेशातील नागरिकांचे पाठबळ मिळणार असल्याने तिचा उत्साह चांगलाच वाढणार आहे. त्यामुळे पी व्ही सिंधूवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या जाणार आहेत. आज पी व्ही सिंधूचा सामना सुपानिडा कटेथोंगसोबत होणार आहे.

5) रत्नानोक इन्तावोक - थायलंडच्या रत्नानोक इन्तावोकने 2013 ची वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकली आहे. त्यासह इंडिया ओफन स्पर्धा इन्तावोकने तीन वेळा आपल्या खिशात घातली आहे. त्यामुळे रत्नानोक इन्तावोकचा चांगलाच दरारा आहे. सध्या इन्तावोक ही जागतिक पातळीवरची सहाव्या क्रमांकाची खेळाडू म्हणून गणली जाते. इन्तावोकने 2022 ला मलेसिया ओपन स्पर्धा जिंकली होती या स्पर्धेत इन्तावोकने चेन युफेईचा पराभव केला होता. या स्पर्धेत इन्तावोक चांगली खेळी करण्यास सज्ज झाली आहे.

6) कॅरोलिना मरीन - स्पेनच्या कॅरोलिना मरीन या खेळाडूचे नाव महिला एकेरीमध्ये चांगलेच नावाजलेले आहे. तिने इंडिया ओपन स्पर्धेत तर आपल्या उत्कृष्ट खेळीमुळे वादळ निर्माण केले होते. मरीनने तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकलेली आहे. मरीनने 2016 च्या ऑलम्पीकमध्येही सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे मरीनचा बॅडमिंटन खेळात चांगलाच दबदबा आहे. मात्र तिने 2021 च्या बीडब्लूएफ स्पर्धेतील विजयानंतर कोणतीही मोठी स्पर्धा जिंकली नाही.

7) ही बिंगजिओ - चीनची ही बिंगजिओ ही 2014 ची युथ ऑलम्पीक चॅम्पियनशीप विजेती खेळाडू आहे. तिने चेन युफेईनंतर इंडीया ओपन स्पर्धेत खेळणारी खेळाडू असेल. 2022 ला ही बिंगजिओने डेन्मार्क ओपन आणि फ्रेंच ओपन जिंकून 2022 चा शेवट केला होता. ही बिंगजिओ ही जागतिक पातळीवरची पाचव्या क्रमांकाची खेळाडू म्हणून नावाजलेली आहे.

8) चेन क्विंग चेन जीया यी फॅन - जागतिक पातळीवर महिला दुहेरीत प्रथम कमांकावर असलेली चेन क्विंग चेन - जीया यी फॅन ही चीनची हुकमी जोडी आहे. महिलांच्या दुहेरीसाठी त्यांचा सर्वाधिक धोका असणार आहे. ही जोडी इंडिया ओपन स्पर्धेत खेळण्यासाठी उतरल्यामुळे विजयाची प्रमुख दावेदार मानली जाते. मलेशिया ओपन स्पर्धा जिंकून या जोडीने वर्षाची सुरुवात धमाकेदार केली आहे. या जोडीने 2017, 2021 आणि 2022 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले आहेत. त्यासह त्यांनी सात स्पर्धा सोबत जिंकल्या आहेत.

9) नामी मत्सुयामा- चिहारू शिदा - जपानच्या या जोडीने त्यांच्या सुरुवातीच्या काळापासूनच चांगले काम करत आहे. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ब्राँझ पदक जिंकले आहे. त्यासह त्यांनी सोबतच 2015 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पदकावर आपले नाव कोरले होते. जपानच्या जोडीने इंडोनेशिया ओपन, थायलंड ओपन आणि इंग्लंडच्या सर्व चॅम्पियनशिप सोबत खेळल्या आहेत. नवीन वर्षात विजयी घोडदौड करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.

10) पर्ली टॅन - तिन्हाह मुरलीथरण - मलेशियाच्या पर्ली टॅन - तिन्हाह मुरलीथरण या जोडीने कॉमनवेल्थ गेममध्ये विजय संपादन केला होता. मुरलीथरण ही तर महिला दुहेरीतील जागतिक पातळीवरची विजेता आहे. या जोडीने गेल्या वर्षी फ्रेंच ओपनचे विजेतेपदही पटकावले होते, तर तब्बल तीन स्पर्धेत ही जोडी सेमी फायनलला धडकली होती.

हेही वाचा - Ranji Trophy Delhi Vs Mumbai: 'दरवेळी खेळाडू चांगली कामगिरी करेल असे नाही', रणजीच्या सामन्यापूर्वी अजिंक्य रहाणेकडून पाठराखण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.