बासेल (स्वित्झर्लंड): स्विस ओपनचा फायनल सामना ( Final of Swiss Open ) पीव्ही सिंधू विरुद्ध बुसानन ओंगबामरुंगफान ( PV Sindhu vs Busanan Ongbamarungphan ) यांच्यात पार पडला. भारतीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने स्विस ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत 7व्या स्थानी असलेल्या सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा 21-16, 21-8 असा सलग गेममध्ये पराभव केला. सिंधूने प्रथमच स्विस ओपन सुपर 300 चे विजेतेपद पटकावले ( Sindhu wins Swiss Open Super 300 ) आहे. पूर्वार्धात थायलंडच्या खेळाडूने दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूला टक्कर दिली. परंतु दुसऱ्या गेममध्ये सिद्धूने ओंगबामरुंगफनला कोणतीच संधी दिली नाही.
-
PV Sindhu beats Busanan Ongbamrungphan of Thailand by 21-16, 21-8 to claim the Swiss Open 2022 women's singles title.
— ANI (@ANI) March 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(File photo) pic.twitter.com/pvQolIzhuZ
">PV Sindhu beats Busanan Ongbamrungphan of Thailand by 21-16, 21-8 to claim the Swiss Open 2022 women's singles title.
— ANI (@ANI) March 27, 2022
(File photo) pic.twitter.com/pvQolIzhuZPV Sindhu beats Busanan Ongbamrungphan of Thailand by 21-16, 21-8 to claim the Swiss Open 2022 women's singles title.
— ANI (@ANI) March 27, 2022
(File photo) pic.twitter.com/pvQolIzhuZ
पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. एक वेळीस सामना 13-13 असा बरोबरीत होता. यानंतर सिंधूने सलग तीन गुण मिळवत आघाडी घेतली. बुसाननने पुनरागमन करत 18-16 अशी बरोबरी साधली, पण त्यानंतर सलग तीन गुण घेत सिंधूने 21-16 अशा फरकाने गेम आपल्या नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने बुसाननला कोणत्याही प्रकारची संधी दिली नाही. एकेकाळी भारतीय महिला खेळाडू 20-4 अशा फरकाने पुढे होती.
बुसाननने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करताना सलग 4 गुण मिळवले, मात्र एका गुण घेऊन सिंधूने सामन्यासह विजेतेपद पटकावले. सिंधूचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे. तिने जानेवारीमध्ये सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनल स्पर्धा ( Syed Modi India International Competition ) जिंकली होती. सिंधूने 2019 साली बासेलमध्येच वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते.
जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने उपांत्य फेरीत थायलंडच्या सुपानिडा केथांगचा ( Thailand Supanida Keithang ) पराभव केला होता. ज्यामध्ये तिने 21-18, 15-21, 21-19 अशा फरकाने मात केली होती. हा सामना सुमारे 79 मिनिटे चालला होता. आता भारतीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला या स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले आहे.