मुंबई - प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वाला २० जुलैपासून सुरुवात होत आहे. फार कमी काळात प्रसिद्धी मिळालेल्या प्रो-कबड्डीच्या या नव्या हंगामासाठी एक बदल करण्यात आला आहे.
यंदा सामन्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून, सामने रात्री आठऐवजी संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहेत. याबाबत एक अधिकृत पत्रक काढून स्पर्धेचे आयोजक मार्शल स्पोर्ट्स यांनी याची घोषणा केली.
लोकांना काहीतरी नवीन देण्यासाठी आणि टीव्हीवरुन सामने पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी हा बदल करण्यात आला असल्याचे, प्रो-कबड्डीचे लिगचे कमिशनर अनुप गोस्वामी यांनी सांगितले. मागच्या हंगामाचे विजेतेपद बंगळुरु बुल्स या संघाने जिंकले होते.