ETV Bharat / sports

प्रो कबड्डी लीगचा 'नवा चॅम्पियन' : दबंग दिल्लीवर मात करत बंगाल वॉरियर्सने पटकावलं जेतेपद - प्रो कबड्डी फायनल

शनिवारी संध्याकाळी अहमदाबादच्या ट्रान्सस्टॅडिया मैदानात पार पडलेल्या अंतिम सामन्यात बंगालने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या सत्रात दबंग दिल्लीने स्पर्धेतील फॉर्म कायम राखत आक्रमक सुरूवात केली. मणिंदर सिंहच्या अनुपस्थितीत खेळणारा बंगालचा संघ सुरुवातीच्या काही मिनिटांत अडखळत खेळताना दिसला. मात्र, इराणचा चढाईपटू मोहम्मद नबीबक्षने सामन्याचे चित्र पालटले.

प्रो कबड्डी लीग 'नवा चॅम्पियन' : दबंग दिल्लीचे नामोहरन करत बंगाल वॉरियर्सने पटकावलं जेतेपद
author img

By

Published : Oct 20, 2019, 7:40 AM IST

Updated : Oct 20, 2019, 8:01 AM IST

अहमदाबाद - प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामातील साखळी सामन्यांत सर्वोत्तम कामगिरी करत दबंग दिल्लीने अंतिम फेरीत धडक मारली. तेव्हा बंगाल वॉरियर्सने अंतिम सामन्यात दबंग दिल्लीचा ३९-३४ असे नामोहरन करत प्रथमच प्रो कबड्डी विजेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात दिल्ली संघाची बचावफळी अपयशी ठरल्याने, त्यांचा पराभव झाला. तर बंगालने मोक्याच्या क्षणी दमदार पुनरागमन करत दिल्लीचा पराभव केला.

शनिवारी संध्याकाळी अहमदाबादच्या ट्रान्सस्टॅडिया मैदानात पार पडलेल्या अंतिम सामन्यात बंगालने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या सत्रात दबंग दिल्लीने स्पर्धेतील फॉर्म कायम राखत आक्रमक सुरूवात केली. मणिंदर सिंहच्या अनुपस्थितीत खेळणारा बंगालचा संघ सुरुवातीच्या काही मिनिटांत अडखळत खेळताना दिसला. मात्र, इराणचा चढाईपटू मोहम्मद नबीबक्षने सामन्याचे चित्र पालटले.

पहिल्या सत्रात नवीन कुमारने पुन्हा एकदा आक्रमक चढाया करत दिल्लीला आघाडी मिळवून दिली. दबंग दिल्लीने पहिल्या काही मिनीटांमध्ये दिल्लीने ५ गुणांची आघाडी घेतली होती. तेव्हा नबीबक्षने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. त्याच्या खेळामुळे बंगालने दमदार पुनरागमन करत सामन्यात बरोबरी साधली. पहिल्या सत्रात दिल्लीची बचावफळी गुणांची कमाई करु शकली नाही, ज्यामुळे पहिल्या सत्राअखेरीस बंगालने १७-१७ अशी बरोबरी साधली.

बंगालच्या मोहम्मद नबीबक्ष आणि सुकेस हेगडेने दुसऱ्या सत्रात सामन्याचे चित्र पालटून टाकले. दोघांनी दमदार चढाईचे प्रदर्शन करत दिल्लीच्या बचावफळीला खिंडार पाडले. त्यांना बंगालच्या बचावफळीनेही आपल्या चढाईपटूंना उत्तम साथ दिली.

मात्र, अखेरच्या सत्रात दबंग दिल्लीच्या नवीन कुमारने चढाईत काही गुणांची कमाई करत बंगालला झुंजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. अखेर बंगालने ३९-३४ च्या फरकाने सामन्यात बाजी मारत प्रो-कबड्डीचे आपले पहिले विजेतेपद पटकावले.

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
Last Updated : Oct 20, 2019, 8:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.