कटक - पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'चे ओडिशाच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधेच्या माध्यमातून या स्पर्धेचे उद्घाटन करतील. देशातील १५९ विद्यापीठांमधील ३ हजार ४०० खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
हेही वाचा -पीएसएलमध्ये चालू सामन्यादरम्यान फिक्सिंग?
या खेळांमध्ये रग्बीसह १७ खेळ समाविष्ट आहेत. केआरआयटीच्या यजमान विद्यापीठाची विद्यार्थीनी धावपटू द्युती चंद या स्पर्धेचा भाग होण्यासाठी उत्साहित आहे. ही स्पर्धा १ मार्चपर्यंत चालणार असून या खेळांमध्ये प्रथमच तलवारबाजीचा समावेश करण्यात आला आहे.
संध्याकाळी मोदी 'खेलो इंडिया'च्या उद्घाटन सोहळ्याला संबोधित करतील. ओडिशा सरकारच्या सहकार्याने भारत सरकारतर्फे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स सुरू होत आहेत. ही विद्यापीठ पातळीवर आयोजित करण्यात आलेली सर्वांत मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, कुंपण, ज्युडो, पोहणे, कुस्ती, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, टेबल टेनिस, टेनिस, व्हॉलीबॉल, रग्बी आणि कबड्डी असे एकूण १७ खेळ असणार आहेत.