नवी दिल्ली - अशियाई चॅम्पियन बॉक्सिंगपटू पूजा राणी (७५ किलो ) हिने स्पेनच्या कास्टेलोन येथे सुरू असलेल्या ३५व्या बॉक्सेम आंतरराष्ट्रीय स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. तर दुसरीकडे दोन वेळची जागतिक कास्य पदक विजेती लवलीना बोरगोहेन (६९) हिचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला.
बुधवारी उशिरा रात्री झालेल्या सामन्यात राणीने इटलीच्या असुंता कॅनफोरा हिचा पराभव केला. याआधी भारताची स्टार बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम ही ५१ किलो, सिमरनजीत कौर (६० किलो) आणि जास्मीन (५७ किलो) या आपापल्या वजनी गटात अंतिम चारमध्ये दाखल झाल्या आहेत.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली लवलीनाचा रुसच्या सादम दालगातोवा हिने ५-० ने पराभव केला. अशियाई स्पर्धेतील कास्य पदक विजेती मनिषा जैन (५७ किलो) हिला इटलीच्या इरमा तीस्ताने ५-० ने पराभव करत, जैन हिचे स्पर्धेतीत आव्हान संपुष्टात आणले.
हेही वाचा - विनेश फोगाटने विश्वविजेत्या खेळाडूला धूळ चारत पटकावलं सुवर्णपदक
हेही वाचा - आष्टीच्या शायान अलीची महाराष्ट्र केसरीसाठी निवड, 92 किलो वजन गटात करणार बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व