नवी दिल्ली - आशियाई चॅम्पियन पूजा रानी आणि विकास कृष्णन यांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. जॉर्डनच्या अम्मानमध्ये झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात पूजाने तर, ६९ किलो वजनी गटात विकासने ही कामगिरी केली.
हेही वाचा - ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विश्वविजेता; भारताचा ८५ धावांनी पराभव
या स्पर्धेत पूजाने थायलंडच्या पोर्निपी चुटे हिचा ५-० असा पराभव केला. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय बॉक्सिंगपटू होण्याचा मानही पूजाने मिळवला. तर, विकासने जपानच्या सेव्होनोरॅटस ओझाकाला नमवत तिसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे.
उपांत्य फेरीत पूजाचा सामना चीनच्या ली कियानशी होईल. ७५ किलो वजनी गटात ती अव्वल नामांकित बॉक्सर आहे. कियानने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मंगोलियाच्या यागमार्जरगलचा ५-० असा पराभव केला. विकासचा पुढील सामना कझाकिस्तानच्या द्वितीय मानांकित अबलाखान जुसुपोव्हशी होणार आहे.