ETV Bharat / sports

कुस्तीपट्टू नरसिंग यादवच्या विरुद्ध एफआयआर दाखल; 'या' नेत्याचा प्रचार करणे भोवले - campaigned for the Congress party

नरसिंग यादव सध्या मुंबई पोलीस दलात एसपी म्हणून कार्यरत आहे.

नरसिंग यादव आणि संजय निरुपम
author img

By

Published : Apr 23, 2019, 2:21 PM IST

मुंबई - मुंबई वायव्य मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत असलेल्या संजय निरुपम यांच्या प्रचार मोहिमेत सहभागी झाल्याचा आरोप ठेवत मुंबईतील अंबोली पोलिसांनी सोमवारी नरसिंग यादवविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. नरसिंग यादव सध्या मुंबई पोलीस दलात एसपी म्हणून कार्यरत आहे.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात कायद्यानुसार शासकीय अधिकाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करता येत नाही. मात्र, नरसिंग यादवने निरुपम यांच्या प्रचार मोहिमेत भाग घेतल्याने त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

नरसिंग यादव कुस्तीपटू असून भारताकडून २००८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते. या यशानंतर नरसिंगची महाराष्ट्र पोलीसमध्ये थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.