नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंशी आज भेट घेतली. मोदींनी खेळाडूंसोबत नाश्ता देखील केला. यावेळी त्यांनी खेळाडूंना दिलेले वचन देखील पूर्ण केलं. मोदींनी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सोबत आईसक्रीम खाल्लं. तर भालाफेकपटू नीरज चोप्राला त्यांनी चूरमा खाऊ घातला. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 7 पदके जिंकत इतिहास रचला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी भारतीय खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरिल ध्वजारोहण कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज त्यांनी खेळाडूंची भेट घेतली. मोदींनी यावेळी अॅथलिटमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राला चूरमा खाऊ घातला. तर पी. व्ही. सिंधूला दिलेल्या वचनाप्रमाणे सोबत आईसक्रीम देखील खाल्लं.
टोकियो ऑलिम्पिकला जाण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला वचन दिले होतं की, पदक जिंकून परत आल्यानंतर ते सिंधूला आईसक्रीम खाऊ घालतील. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकले. तेव्हा मोदींची सिंधूला आईसक्रीम खाऊ घालत दिलेले वचन पूर्ण केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगला 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. याशिवाय मोदींनी कुस्तीपटू रौप्य पदक विजेता रवी कुमार दहिया, कास्य पदक विजेता बजरंग पुनिया, रौप्य पदक विजेती मीराबाई चानू, कास्य पदक विजेती महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेनसह विनेश फोगाट, सोनम मलिक दीपक पुनिया यांच्यासोबत देखील बातचित केली.
हेही वाचा - चाय पे चर्चा : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंना भेटले राष्ट्रपती रामनाथ कोविंद
हेही वाचा - भारतीय तिरंदाजांनी इतिहास रचला इतिहास, महिला-पुरूष संघाने जिंकलं गोल्ड