हैदराबाद - यंदाच्या प्रो कबड्डी स्पर्धेत जयपूर पिंक पँथर्सच्या संघाने यू मुंबाचा धुव्वा उडवत विजयारंभ केला. या सामन्यात त्यांनी यू मुंबावर तब्बल 19 गुणांनी मात केली. कर्णधार दीपक हुडाच्या दमदार कामगिरीमुळे जयपूरला हा विजय मिळवता आला.
-
The skipper @DeepakHooda5555 was in prime form last night notching his first Super 10 of the season.#RoarForPanthers #PantherSquad #Panthers #TopCats #JaipurPinkPanthers #JPP #Jaipur#Kabaddi #ProKabaddi #JaiHanuman #LetsKabaddi #KhelKabaddi #PKL #LePanga #StarSports pic.twitter.com/POPS3RXE96
— Jaipur Pink Panthers (@JaipurPanthers) July 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The skipper @DeepakHooda5555 was in prime form last night notching his first Super 10 of the season.#RoarForPanthers #PantherSquad #Panthers #TopCats #JaipurPinkPanthers #JPP #Jaipur#Kabaddi #ProKabaddi #JaiHanuman #LetsKabaddi #KhelKabaddi #PKL #LePanga #StarSports pic.twitter.com/POPS3RXE96
— Jaipur Pink Panthers (@JaipurPanthers) July 23, 2019The skipper @DeepakHooda5555 was in prime form last night notching his first Super 10 of the season.#RoarForPanthers #PantherSquad #Panthers #TopCats #JaipurPinkPanthers #JPP #Jaipur#Kabaddi #ProKabaddi #JaiHanuman #LetsKabaddi #KhelKabaddi #PKL #LePanga #StarSports pic.twitter.com/POPS3RXE96
— Jaipur Pink Panthers (@JaipurPanthers) July 23, 2019
हैदराबादच्या गच्चीबावली इंडोर स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. सलामीच्या सामन्यात विजय मिळवलेल्या यू मुंबाला जयपूरविरुद्धच्या सामन्यात चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यांनी हा सामना 42-23 च्या फरकाने गमावला. पहिल्या सत्रात जयपूरच्या संघाने 22-9 ने आघाडी मिळवली होती. काही मिनिटांमध्ये यू मुंबाच्या संघाला सर्वबाद करत जयपूरने आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रात यू मुंबाच्या संघाला आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, जयपूरच्या दमदार आक्रमणापुढे त्यांचा निभाव लागला नाही. अभिषेक सिंह आणि डाँग जिऑन ली यांनी चढाईत काही गुणांची कमाई केली. मात्र बचावफळीत कर्णधार फजल अत्राचलीने जयपूरला सर्वबाद करण्याची संधी वाया घालवली. आणि त्याच्या खराब कामगिरीचा फटका संघाला बसला.
जयपूरचा कर्णधार दीपक हुडाने चढाईमध्ये 11 गुणांची कमाई केली. त्याला नितीन रावल आणि दीपक नरवालने चांगली साथ दिली.