पाटणा - प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात सलग चौथ्या विजयाबरोबर जयपूर पिंक पँथर्सने गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले आहे. जयपूरने शनिवारी झालेल्या सामन्यात पाटणा पायरेट्सचा ३४-२१ ने पराभव केला.
-
The #PantherSquad continued its good run in the league starting off the Patna leg with a win over the home side.#RoarForPanthers #TopCats #JaipurPinkPanthers #Kabaddi #ProKabaddi #JaiHanuman #PKL #LePanga #StarSports #VIVOProKabaddi
— Jaipur Pink Panthers (@JaipurPanthers) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(2/2) pic.twitter.com/k8A0pnLDms
">The #PantherSquad continued its good run in the league starting off the Patna leg with a win over the home side.#RoarForPanthers #TopCats #JaipurPinkPanthers #Kabaddi #ProKabaddi #JaiHanuman #PKL #LePanga #StarSports #VIVOProKabaddi
— Jaipur Pink Panthers (@JaipurPanthers) August 4, 2019
(2/2) pic.twitter.com/k8A0pnLDmsThe #PantherSquad continued its good run in the league starting off the Patna leg with a win over the home side.#RoarForPanthers #TopCats #JaipurPinkPanthers #Kabaddi #ProKabaddi #JaiHanuman #PKL #LePanga #StarSports #VIVOProKabaddi
— Jaipur Pink Panthers (@JaipurPanthers) August 4, 2019
(2/2) pic.twitter.com/k8A0pnLDms
जयपूरचा संघ पहिल्या सत्रात १५-९ ने आघाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या सत्रातही जयपूरच्या संघाने दमदार प्रदर्शन करत तीन वेळा विजेत्या पाटणाला पराभूत केले. जयपूरकडून दीपक नरवाल आणि संदीप धुल यांनी चांगले प्रदर्शन केले. दीपक नरवालने ९ तर, संदीप धुलने ८ गुण पटकावले. जयपूरने चढाईमध्ये १२, टॅकलमध्ये १७, अतिरिक्त १ आणि ऑलआऊटमध्ये ४ गुण पटकावले आहेत.
पाटणा पायरेट्सकडून कर्णधार प्रदीप नरवालने ९ गुण पटकावत संघाच्या कामगिरीत महत्वाचा वाटा उचलला. पाटणाने चढाईमध्ये १२, टॅकलमध्ये ७ तर अतिरिक्त म्हणून २ गुण पटकावले आहेत. पाटणाने चार सामन्यात दोन पराभव पत्करले आहेत. हा संघ ११ गुणांसंह सहाव्या क्रमांकावर आहे.