ETV Bharat / sports

Abbas Writer of Pathan Say : 'पठाण'चे लेखक अब्बासने सांगितले शाहरुख आणि हृतिकसाठी खास शैलीत लिहावे लागतात संवाद - Abbas Writer of Pathan Say

शाहरुख खानचा नुकताच प्रदर्शित झालेला 'पठाण' चित्रपट जगभर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचे लेखक अब्बास टायरवाला यांनी शाहरुख खान आणि हृतिक रोशनबद्दल बोलले. यावेळी त्यांनी दोघांसाठी संवाद लिहिण्यात काय फरक आहे हे सांगितले.

Abbas, Writer of 'Pathan' said That Dialogues for Shahrukh and Hrithik have to be written in a special style
'पठाण'चे लेखक अब्बासने सांगितले शाहरुख आणि हृतिकसाठी खास शैलीत लिहावे लागतात संवाद
author img

By

Published : Feb 3, 2023, 7:56 PM IST

मुंबई : बॉलीवूडचा किंग खानचा नुकताच प्रदर्शित झालेला 'पठाण' बॉक्स ऑफिसवर कमालीची कामगिरी करीत आहे. 'पठाण'ची जादू सगळीकडे पसरली आहे. चित्रपटाचा सीन असो की कथा अगदी संवादांनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, चित्रपटाचे संवाद लेखक अब्बास टायरवाला यांनी अलीकडेच एका मुलाखतीत शाहरुख खान आणि हृतिक रोशनबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी दोघांसाठी संवाद लिहिण्यात काय फरक आहे हे सांगितले.

अब्बास टायरवाला यांनी लिहले 'पठाण'चे संवाद : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाची पटकथा श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे. तर, अब्बास टायरवाला यांनी संवाद लिहिले आहेत. या अप्रतिम जोडीने यापूर्वी एकत्र काम केले आहे. दोघांनीही हृतिक रोशन-टायगर श्रॉफ स्टारर फिल्म 'वॉर'च्या डायलॉगला आपल्या पेनची धार दिली आहे. यादरम्यान त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी सिद्धार्थ आनंद आणि श्रीधर राघवन यांच्यासोबत 'वाॅर' चित्रपटात काम केले होते, तेव्हा प्रत्येक पात्राला काटेकोरपणे स्पर्श करणारे संवाद लिहिण्याची त्यांची कल्पना होती.

कलाकारांचे व्यक्तिमत्त्व पाहून लिहावे लागतात संवाद : यादरम्यान ते म्हणाले की, कबीर आणि खालिदसारखी पात्रे तयार करणे आणि हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफसारख्या स्टार्सना त्या पात्रांमध्ये पूर्णपणे आणणे, त्यांचे जगणे आणि श्वास घेणे ही कल्पना आहे. यासाठी खूप विचार करावा लागला. याउलट, शाहरुख खानसोबतच्या पठाणमध्ये, लेखक आणि दिग्दर्शकांनी सुपरस्टारचे वास्तविक जीवनातील व्यक्तिमत्त्व आणि चित्रपटातील त्याचे पात्र संवादांद्वारे विलीन करण्याचा निर्णय घेतला, जो खूप मजेदार ठरला.

शाहरुखला वैयक्तिक ओळखत असल्याने संवाद लिहणे सोपे झाले : लेखकाने सांगितले की, 'अशोका' आणि 'मैं हूं ना या चित्रपटात शाहरुखशी माझे संभाषण झाले, मला त्याचे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे समजले. पण, त्याची फिल्मी व्यक्तिरेखा इतकी 'लार्जर दॅन लाइफ' आहे की त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नसलेला कोणीही तो पुन्हा तयार करू शकतो. आदित्य चोप्रा आणि सिद्धार्थ आनंद हे शाहरुखला अनेक वर्षांपासून ओळखतात. दुसरीकडे, 25 जानेवारीला रिलीज झालेल्या 'पठाण' चित्रपटाने 9 दिवसांत चांगली कमाई केली आहे. पठाणने दुसरा वीकेंड संपण्यापूर्वी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचा आकडा गाठला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.