अम्मान (जॉर्डन) - भारताचा पुरूष बॉक्सिंगपटू विकास कृष्णनने आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे, तर विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अमित पांघलला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. महिला गटात भारताची लवलिना बोरगोहेनचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. पांघल आणि लवलिना या दोघांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
पुरूष ६९ वजनी गटात विकासने कझाकिस्तानच्या अबलाखान जुसुपोव्हचा उपांत्य फेरीत ३-२ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली.
-
Final Frontier💪🏻@officialvkyadav pulls off an upset win over
— Boxing Federation (@BFI_official) March 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
reigning World Championship bronze medallist Ablaikhan Zhussupov of Kazakhstan to pull 3-2 in the semi-final.
Let’s get the gold, Champ!#PunchMeinHaiDum #OlympicQualifiers pic.twitter.com/Rw0qeiW5K3
">Final Frontier💪🏻@officialvkyadav pulls off an upset win over
— Boxing Federation (@BFI_official) March 10, 2020
reigning World Championship bronze medallist Ablaikhan Zhussupov of Kazakhstan to pull 3-2 in the semi-final.
Let’s get the gold, Champ!#PunchMeinHaiDum #OlympicQualifiers pic.twitter.com/Rw0qeiW5K3Final Frontier💪🏻@officialvkyadav pulls off an upset win over
— Boxing Federation (@BFI_official) March 10, 2020
reigning World Championship bronze medallist Ablaikhan Zhussupov of Kazakhstan to pull 3-2 in the semi-final.
Let’s get the gold, Champ!#PunchMeinHaiDum #OlympicQualifiers pic.twitter.com/Rw0qeiW5K3
पुरुषाच्या ५२ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या हु जियानगुआन याने पांघलचा पराभव केला. रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेता जियानगुआनने अटीतटीच्या लढतीत ३-२ असा पराभव करत पांघलचे स्पर्धेतील आव्हान संपवले.
महिला ६९ किलो वजनी गटात भारताच्या लवलिनाचा पराभव चीनच्या होंग गु हिने केला. होंगने ५-० ने सहज मात दिली. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत दोन वेळा कांस्य पदक विजेती लवलिना हिने उबेकिस्तानच्या मफतूनाखोन मेलिवा हिचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती.
दरम्यान, उपांत्य फेरीआधीच अमित पांगल, विकास कृष्णन आणि लवलिना यांनी टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे.
हेही वाचा - मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकसाठी ठरली पात्र
हेही वाचा - भारताचे ७ बॉक्सिंगपटू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र