भुवनेश्वर - ओडिशा सरकारने भारतीय रग्बी फुटबॉल युनियन (आयआरएफयू) बरोबर २०२३पर्यंत करार केला आहे. या करारात भारतीय राष्ट्रीय रग्बी संघाचे प्रायोजन आणि खेळाडूंच्या उच्च प्रशिक्षणाचा समावेश आहे. कलिंग स्टेडियमवर या करारावेळी ओडिशाचे क्रीडा संचालक आर. विनिल कृष्णा, आयआरएफयूचे अध्यक्ष मेनेक उनवाला, ओडिशाचे क्रीडा व युवक विभागाचे मंत्री तुषारकांती बेहरा उपस्थित होते.
बेहरा म्हणाले, "ही आमच्यासाठी एक महत्त्वाची भागीदारी आहे. अलीकडच्या काळात आपण रग्बीचा विकास आपण पाहिला आहे. विशेषत: या खेळामधील तरुणांचा कल दिसून येतो आणि त्यांची स्पर्धा मोठ्या संख्येने दिसून येत आहे. रग्बी इंडिया आणि ओडिशा सरकार यांच्यातील ही भागीदारी रग्बीच्या विकासास मदत ठरेल. शिवाय भारतीय रग्बीची प्रशिक्षण पातळी सुधारण्यावर भर देईल."
यापूर्वी २०१८मध्येही ओडिशा सरकार भारतीय हॉकी संघाचे प्रायोजक बनले होते. त्याचबरोबर, ओडिशा एफसी फुटबॉल क्लबलादेखील ओडिशा सरकारचा पाठिंबा आहे. हा क्लब इंडियन सुपर लीग (आयएसएल)मध्ये खेळतो.