ETV Bharat / sports

Indian Boxer Nikhat Zareen : निखत जरीन ठरली विश्वविजेती; थायलंडच्या बॉक्सरला पराभूत करून पटकावले सुवर्णपदक

author img

By

Published : May 19, 2022, 10:42 PM IST

महिला बॉक्सर निखत जरीनने ( Womens boxer Nikhat Jareen ) इतिहास रचला आहे. तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. यासह तिने एमसी मेरी कोमची बरोबरी केली आहे. ती ज्युनियर गटात जगज्जेते ठरली आहे.

Boxer Nikhat Zareen
Boxer Nikhat Zareen

नई दिल्ली: भारतीय महिला बॉक्सर निखत जरीनने ( Indian women's boxer Nikhat Jareen ) इस्तंबूल येथे खेळल्या जात असलेल्या महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. निखतने शानदार खेळाच्या जोरावर अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या या बॉक्सरने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. अंतिम फेरीत निखतचा सामना थायलंडच्या जुटामास जितपॉन्ग हिच्याशी झाला, जिथे तिने 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला.

पहिल्या फेरीत भारतीय स्टारने शानदार खेळ दाखवत थायलंडच्या बॉक्सरवर आक्रमक प्रहार केला. तिने काही अप्रतिम पंच मारत सर्व न्यायाधीशांना प्रभावित केले. पहिल्या फेरीनंतर, जिथे निखतला सर्व न्यायाधीशांकडून 10 गुण मिळाले.

Women's World Boxing Championships | Nikhat Zareen beats Thailand boxer Jitpong Jutamas in 52 Kg weight category to win gold medal.

(File pic) pic.twitter.com/5DR6NB6PRz

— ANI (@ANI) May 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दुसरीकडे, जुटामासला 9 गुण मिळाले. दुसऱ्या राऊंडरमध्ये थायलंडची बॉक्सर निखत जरीनवर थोडे वर्चस्व प्रस्थापित करताना दिसून आली. तिसर्‍या फेरीत थायलंडच्या बॉक्सरने काही आक्रमक पंच मारले आणि फेरी संपल्यानंतर ती विजयाची खात्री बाळगताना दिसत होती. निखतचाही आपल्या पंचांवर पूर्ण विश्वास होता आणि न्यायाधीशांचे मत भारताच्या बाजूने गेले.

इस्तंबूल येथे बुधवारी झालेल्या या चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत निखत जरीनने ब्राझीलची बॉक्सर कॅरोलिन डी आल्मेडा हिचा एकतर्फी सामन्यात पराभव केला. माजी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन निखतने 52 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत 5-0 असा पराभव करून इतिहास रचला. भारताची स्टार महिला बॉक्सर एमसी मेरी कोम 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिली आहे तर सरिता देवी, जेनी आर.एल. आणि लेखाने हे देखील किताब आपल्या नावावर केला आहे.

हेही वाचा - Thailand Open 2022 : पी.व्ही. सिंधू थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत दाखल, तर किदाम्बी श्रीकांत स्पर्धेतून बाहेर

नई दिल्ली: भारतीय महिला बॉक्सर निखत जरीनने ( Indian women's boxer Nikhat Jareen ) इस्तंबूल येथे खेळल्या जात असलेल्या महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. निखतने शानदार खेळाच्या जोरावर अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या या बॉक्सरने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. अंतिम फेरीत निखतचा सामना थायलंडच्या जुटामास जितपॉन्ग हिच्याशी झाला, जिथे तिने 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला.

पहिल्या फेरीत भारतीय स्टारने शानदार खेळ दाखवत थायलंडच्या बॉक्सरवर आक्रमक प्रहार केला. तिने काही अप्रतिम पंच मारत सर्व न्यायाधीशांना प्रभावित केले. पहिल्या फेरीनंतर, जिथे निखतला सर्व न्यायाधीशांकडून 10 गुण मिळाले.

  • Women's World Boxing Championships | Nikhat Zareen beats Thailand boxer Jitpong Jutamas in 52 Kg weight category to win gold medal.

    (File pic) pic.twitter.com/5DR6NB6PRz

    — ANI (@ANI) May 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दुसरीकडे, जुटामासला 9 गुण मिळाले. दुसऱ्या राऊंडरमध्ये थायलंडची बॉक्सर निखत जरीनवर थोडे वर्चस्व प्रस्थापित करताना दिसून आली. तिसर्‍या फेरीत थायलंडच्या बॉक्सरने काही आक्रमक पंच मारले आणि फेरी संपल्यानंतर ती विजयाची खात्री बाळगताना दिसत होती. निखतचाही आपल्या पंचांवर पूर्ण विश्वास होता आणि न्यायाधीशांचे मत भारताच्या बाजूने गेले.

इस्तंबूल येथे बुधवारी झालेल्या या चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत निखत जरीनने ब्राझीलची बॉक्सर कॅरोलिन डी आल्मेडा हिचा एकतर्फी सामन्यात पराभव केला. माजी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन निखतने 52 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत 5-0 असा पराभव करून इतिहास रचला. भारताची स्टार महिला बॉक्सर एमसी मेरी कोम 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिली आहे तर सरिता देवी, जेनी आर.एल. आणि लेखाने हे देखील किताब आपल्या नावावर केला आहे.

हेही वाचा - Thailand Open 2022 : पी.व्ही. सिंधू थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत दाखल, तर किदाम्बी श्रीकांत स्पर्धेतून बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.