नवी दिल्ली - मेरी कोम आणि निखत झरीन यांच्यातील बहुचर्चित 'सामना' आज (शनिवार) पार पडला. सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर मेरी कोमने या सामन्यात निखत झरीनचा ९-१ ने पराभव केला. मेरी या विजयासह आता ५१ किलो गटातून भारताकडून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा खेळणार आहे.
पुढील वर्षी चीनमध्ये ३ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दरम्यान, ऑलिंम्पिक पात्रता स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहेत. मेरी या पात्रता स्पर्धेत ५१ किलो गटात भारताचे नेतृत्व करेल.
दरम्यान, निखत झरीनने चीनमध्ये होणाऱ्या ऑलिंम्पिक पात्रता स्पर्धेसाठी संघ निवडताना माझी मेरी कोमशी चाचणी लढत खेळवावी, अशी मागणी केली होती. निखतने क्रीडामत्र्यांनांही याविषयी पत्र लिहिले होते.
त्यात मेरी कोम चाचणीपासून दूर पळते आणि ऑलिंपिक पात्रतेसाठी दोन हात करण्याची तिची तयारी नाही, असा आरोप २३ वर्षीय झरीनने केला होता. त्यानंतर मेरी कोमने भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या 'सिलेक्शन पॉलिसी'शी आपण पालन करणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानुसार जवळपास सर्वच गटातील खेळाडूंना 'ट्रायल' सामने खेळावे लागले.
ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या ट्रायल सामन्यात ५१ किलो वजनी गटात निखत झरीनने ज्योती गुलियाला १०-० अशी मात देत तर मेरी कोमने रितू ग्रेवालचा १०-० ने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.
५७ किलो गटात -
- साक्षी मलिक विरुद्ध मनीषा मौन (७-३)
- सोनिया लाथेर विरुद्ध सोनिया चहल (७-३)
६० किलो गटात -
- सिम्रनजीत कौर विरुद्ध पावत्रा (१०-० )
- सरिता देवी विरुद्ध साक्षी चोप्रा (९-१)
६९ किलो गटात -
- ललिता विरुद्ध मीना राणी (९-१)
- लव्हलिना बोर्गोहेन विरुद्ध अंजली (१०-०)
७५ किलो गटात -
- पूजा राणी विरुद्ध इंद्रजा (१०-०)
- नुपूर विरुद्ध सविता (९-१)
हेही वाचा - ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का, सुमित सांगवानवर एका वर्षांची बंदी
हेही वाचा - 'आपण भाषणबाजीत पुढे, १३५ कोटी लोकसंख्येच्या भारताला ऑलम्पिकमध्ये यश नाही'