नवी दिल्ली - ऑलिम्पिक क्लालिफायरच्या ट्रायल्ससाठी महिला बॉक्सर निखत झरीनची निवड करण्यात आली आहे. निवड समितीने निखतला ५१ किलो वजनी गटात, स्थान दिलं आहे. हे ट्रायल २७ डिसेंबरला इंदिरा गांधी स्टेडियममध्ये घेण्यात येणार आहेत.
![nikhat zareen selected for boxing trials of olympic qualifiers](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/nikhat-zareen-twitter_0911newsroom_1573282994_87.jpg)
निखत झरीन ज्या गटातून खेळणार आहे त्या गटात सहा वेळा विश्वविजेती एमसी मेरी कोम, ज्योती गुलिया आणि हरियाणाची ऋतू ग्रेवाल याही असणार आहेत.
निवड समितीने पहिला क्रमांक मेरी कोमला तर दुसरा निखतला दिला आहे. ज्योती आणि ऋतू यांना अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक दिला आहे.
भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निर्णयानुसार, पहिल्या क्रमांकावर असलेली मेरी कोम चौथ्या क्रमांकाच्या ऋतूशी सामना खेळेल. तर निखत ज्योती विरुद्ध मैदानात उतरेल. या दोनही सामन्यातील विजेते अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.