मुंबई - टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने त्याचे दुसरे स्वप्नही पूर्ण केले आहे. टोकियोत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकण्याचे पहिले स्वप्न त्याने पूर्ण केले. त्यानंतर आता त्याने दुसरे स्पप्नही पूर्ण केले. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने स्वत:च माहिती दिली.
नीरज चोप्रा याने शनिवारी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. यात तो त्याच्या आई-वडिलांसह विमानामध्ये बसलेला दिसत आहे. हे फोटो पोस्ट करता नीरजने लिहलं की, 'आज आयुष्यातील आणखी एक स्वप्न पूर्ण झाले. आई-वडिलांना प्रथमच विमानातून प्रवास घडवतो आहे. तुमचा आशिर्वाद आणि शुभेच्छांचा मी नेहमी कृतज्ञ राहीन.'
-
A small dream of mine came true today as I was able to take my parents on their first flight.
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) September 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आज जिंदगी का एक सपना पूरा हुआ जब अपने मां - पापा को पहली बार फ्लाइट पर बैठा पाया। सभी की दुआ और आशिर्वाद के लिए हमेशा आभारी रहूंगा 🙏🏽 pic.twitter.com/Kmn5iRhvUf
">A small dream of mine came true today as I was able to take my parents on their first flight.
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) September 11, 2021
आज जिंदगी का एक सपना पूरा हुआ जब अपने मां - पापा को पहली बार फ्लाइट पर बैठा पाया। सभी की दुआ और आशिर्वाद के लिए हमेशा आभारी रहूंगा 🙏🏽 pic.twitter.com/Kmn5iRhvUfA small dream of mine came true today as I was able to take my parents on their first flight.
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) September 11, 2021
आज जिंदगी का एक सपना पूरा हुआ जब अपने मां - पापा को पहली बार फ्लाइट पर बैठा पाया। सभी की दुआ और आशिर्वाद के लिए हमेशा आभारी रहूंगा 🙏🏽 pic.twitter.com/Kmn5iRhvUf
दरम्यान, नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.59 मीटर लांब भाला फेकत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे एकमात्र सुवर्ण पदक आहे. तो अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिलाच खेळाडू आहे.
टोकियोहून परतल्यानंतर नीरज चोप्रा व्यस्त आहे. तो वेगवेगळ्या ठिकाणी सन्मान सोहळ्यात हजेरी लावत आहे. यामुळे तो आपल्या कुटुंबीयांना अधिकाधिक वेळ देऊ शकत नाहीये.
मागील महिन्यात नीरज चोप्राने सांगितलं की, तो कुटुंबीयासोबत काही दिवस वेळ घालवण्यासाठी 2021 मध्ये कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नाही. पण पुढील वर्षी 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत तो भाग घेणार आहे.
हेही वाचा - युझवेंद्र चहलला टी-20 विश्वकरंडक संघातून वगळलं, पत्नी धनश्री वर्माने शेअर केली भावूक पोस्ट
हेही वाचा - T-20 World Cup: मार्गदर्शक बनल्यानंतर वादात अडकला महेंद्रसिंग धोनी, होतोय गंभीर आरोप