बुडापेस्ट- ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रानं पुन्हा इतिहास रचत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या किर्तीचा झेंडा फडकवलाय. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकलयं. अशी कामगिरी करणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू आहे. नीरजनं पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत 88.17 मीटरचा थ्रो केला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं सर्वोत्तम कामगिरी केली. पाकिस्तानच्या विद्यमान राष्ट्रकुल चॅम्पियन अर्शद नदीमनं ८७.८२ मीटर थ्रो करून रौप्यपदक मिळवलं. तर झेक प्रजासत्ताकच्या जाकुब वडलेचनं (८६.६७ मीटर) कांस्यपदक मिळवलं.
पाकिस्तानचा नदीम तिसर्या फेरीपासू दुसऱ्या स्थानावर कायम राहिला. मात्र, भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकल्यामुळे पाकिस्तानचा नदीनला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपचे पदक यापूर्वी केवळ नेमबाज अभिनव बिंद्राने मिळवलं होतं. अशी कामगिरी करणारा नीरज चोप्रा दुसरा खेळाडू ठरलाय. अभिनव बिंद्रानं वयाच्या २३ व्या वर्षी वर्ल्ड चॅम्प्यिनशिपचं विजेतेपद जिंकल होतं. तर २५ व्या वर्षी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल होतं. तर नीरज चोप्रानं यापूर्वी २०२२ मधील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल होतं.
-
#NeerajChopra makes us #Proud again!!#IndianArmy congratulates Subedar Neeraj Chopra on bagging #GoldMedal🥇 in Men's #Javelin at World Athletics Championship 2023 in Budapest with a throw of 88.17 meters.@Neeraj_chopra1 pic.twitter.com/mV76vQetWy
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) August 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#NeerajChopra makes us #Proud again!!#IndianArmy congratulates Subedar Neeraj Chopra on bagging #GoldMedal🥇 in Men's #Javelin at World Athletics Championship 2023 in Budapest with a throw of 88.17 meters.@Neeraj_chopra1 pic.twitter.com/mV76vQetWy
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) August 27, 2023#NeerajChopra makes us #Proud again!!#IndianArmy congratulates Subedar Neeraj Chopra on bagging #GoldMedal🥇 in Men's #Javelin at World Athletics Championship 2023 in Budapest with a throw of 88.17 meters.@Neeraj_chopra1 pic.twitter.com/mV76vQetWy
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) August 27, 2023
ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर उंचावला यशाचा आलेख- टोकियोमधील ऐतिहासिक यशानंतर अनेक सत्कार समारंभात उपस्थित राहिल्यामुळे नीरजच्या प्रशिक्षणात खंड पडला होता. त्यामुळे वजन वाढल्यानंतर काही काळ त्याने सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहणं पसंत केलं. क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर नीरज चोप्राला ऑनलाईन सर्चमध्ये सर्वाधिक पाहिले जाते. टोकियोच्या यशानंतर नीरज चोप्राच्या ब्रँड व्हॅल्यू कमालीचा वाढलायं. जगभरातील मोठ्या कंपन्यांनी त्याच्याशी करार केले आहेत. त्याच्या इन्स्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या वाढलीयं.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी मैदानात जाण्यास सुरुवात- नीरज चोप्रा हा हरियाणात एकत्रित कुटुंबात वाढलेला आहे. १७ वर्षांचा असताना नीरजला लठ्ठपणा कमी करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांकडून दबाव होता. मुलाला शिस्त लावण्यासाठी त्याच्या वडिलांनी स्टेडियमवर धावण्यासाठी पाठविलं. नीरज हा काकांसोबत गावापासून १५ किमी दूर असलेल्या पानिपतच्या शिवाजी स्टेडियमवर जावू लागला. स्टेडियमवर इतर खेळाडून भालाफेकचा सराव करत असताना त्याला भालाफेक क्रीडाप्रकारात रस निर्माण झाला. येथूनच त्याच्या करियरची मुहूर्तमेढ रोवली.
हेही वाचा-