भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे ७३ वी राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची कन्या केनिशा गुप्ता हिने १०० मीटर फ्री स्टाईल प्रकारामध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.
राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप : शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या 'या' खेळाडूंनी गाठली अंतिम फेरी
केनिशा गुप्ता हिने १०० अंतर ५८.२६ सेकंदामध्ये पार करत नवा किर्तीमान नोंदविला. दरम्यान, या स्पर्धत केनिशा हिने अंतिम राऊंडमध्ये ९ स्पर्धकांना मागे टाकत या विक्रमाला गवसणी घातली आहे.
रविचंद्रन अश्विन आयपीएल २०२० हंगामात 'या' संघाकडून खेळणार...?
अंतिम राऊंडमध्ये केनिशा विरोधात बिहारची माही, हरियानाची दिव्या, आसामची शिवांगी शर्मा, आरएसपीबीची अवंतिका महाराष्ट्राची साध्वी आणि कर्नाटकची स्मृती होती. तर रिझर्व कोट्यातून तमिळनाडूची स्वर्णा आणि दिल्लीची भव्या ह्याही केनिशा विरोधात उभ्या टाकल्या होत्या. या सर्वांना मागे टाकत केनिशा हिने हा पराक्रम केला आहे.