नवी दिल्ली : खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशात केले जात आहे. या स्पर्धेत अनेक युवकांनी आपले कौशल्य दाखवून दिले. नाशिकच्या विनाताई अहेर याही या तरुणांपैकी एक आहेत. तिने 40 किलो वजनी गटात विजेतेपद पटकावून नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. खेलो इंडियाबद्दल विनाताई म्हणाल्या की, हे खूप चांगले व्यासपीठ आहे. विनाताईंच्या म्हणण्यानुसार, हे एक चांगले व्यासपीठ आहे. देशातील सर्वोत्तम तरुण वेटलिफ्टर्स येथे येतात. हे माझ्या श्रेणीतील एक चांगले आव्हान होते. ओडिशाच्या जोश्नाशी माझी चांगली लढत झाली आणि आता पुढे कसे खेळायचे याची मला चांगली कल्पना आहे.
इंडिया युथ गेम्स : मध्य प्रदेशातील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये 17 वर्षीय विठाईने या स्पर्धेत एकूण 129 किलो वजन उचलले आहे. यामध्ये विनाताईने स्नॅचमध्ये 57 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 72 किलो वजन उचलून नवा विक्रम केला आहे. विनाताई मनमाड जिममध्ये प्रवीण व्यवहारे यांच्याकडून प्रशिक्षण घेत असलेल्या विनाताई या वजन गटात राष्ट्रीय युवा रेकॉर्डधारक आकांक्षा व्यवहारे यांच्यासोबत सराव करते. आकांक्षा व्यवहारे 14 वर्षांची असून ती प्रथमच मध्य प्रदेशात आयोजित खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहे. त्याचवेळी मनमाडच्या एमजी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विनाताईने देशासाठी पदक जिंकायचे असल्याचे सांगितले.
विनाताईला केले उद्धृत : भारतीय क्रीडा प्राधिकरणाने विनाताईला उद्धृत केले आहे की 'येथे येण्याचा अनुभव खूप चांगला होता. ही स्पर्धाही चांगली झाली. आमच्यासारख्या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. येथून मला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे आहे. राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी मला सर्व काही करावे लागेल. देशासाठी पदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे. विनाताईने गेल्यावर्षी नागरकोइलमध्ये पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली. विनाताई म्हणाल्या, 'नागरकोइलमध्ये मी दुसऱ्या क्रमांकावर आली. त्या स्पर्धेत पहिला क्रमांक ओडिशाच्या जोश्ना साबरने पटकावला. जीचा मी आता येथे पराभव केला आहे. आता अधिकाधिक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन मी स्वत:ला सिद्ध करेन.
शुभेच्छा देणाऱ्यांची रिघ : साताऱ्यातील कराड तालुक्यामधील किरपे या खेडेगावातील प्राची अंकुश देवकर हिची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शेतकर्याची मुलगी असलेली प्राची ही मध्य प्रदेशमध्ये 31 जानेवारीपासून सुरू होणार्या खेलो इंडिया स्पर्धेत साताऱ्याचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील निवडीमुळे तिच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांची रिघ लागली आहे. लेकीच्या या कौतुकाने तिच्या आई-वडीलांचा ऊर अभिमानाने भरून येत आहे.
प्राचीच्या यशाचा प्रवास कौतुकास्पद : गुणवत्तेला कसलाही आधार लागत नाही. किंबहुना गुणवत्ता ही कधीच गरीब-श्रीमंत असा भेदभाव करत नाही. हिरा जसा चमकायचा राहत नाही, तशीच गुणवत्ता ही कधी ना कधी समोर येते. त्याचाच प्रत्यय प्राची देवकर हीच्या निवडीने आला आहे. शेतकर्याची मुलगी असलेल्या प्राचीचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. आई-वडीलांचे पाठबळ, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर तिने आतापर्यंत 70 हून अधिक ट्रॉफी तसेच मेडल्स मिळवली आहेत. खेलो इंडिया स्पर्धेतील निवडीमुळे तिच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांची रिघ लागली आहे. लेकीच्या या कौतुकाने तिच्या आई-वडीलांचा ऊर अभिमानाने भरून येत आहे.